पंढरपूर – शहर आणि उपनगरा मध्ये गेल्या महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना तसेच महिला, मुली तसेच शाळा, काँलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या मोकाट कुत्र्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने या मोकाट कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.
शहरा बरोबरच शहराबाहेरील सहयोगनगर, मनिषानगर, गणेश नगर, पुंडलिक नगर, गुरुकृपा सोसायटी, टाकळी रोड,रेल्वे स्टेशन परिसर, लिंकरोड, जुना कराड नाका ते शेळके वस्ती परिसर आदि उपनगरांमध्ये नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे. विशेष म्हणजे वरील सर्व ठिकाणे ही शाळा, काॕलेजेस व रहदारीचा परिसरा मध्ये मोडत आहेत.
या परिसरातून मोकाट कुत्रे सायकल, दुचाकी वाहनांचा पाठलाग करतात तसेच चालत फिरणारया पादचारयांच्या, शाळा, शिकवणी, काॕलेजेसला जाणाऱ्या मुलामुलींच्या अंगावर धावून जातात. त्यामुळे पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयांच्या आदेशाचे त्वरीत पालन करून उपनगरातील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील सर्वसामान्य नागरिकांबरोबरच येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत जगन्नाथ डोंबाळी यांनी केली आहे.
Post Views: 5