पंढरपूर – पुढील महिन्यात २५ जुलैला राज्याचे मुख्यमंत्री पंढरपुरात आषाढी एकादशीला येणार आहेत. तेव्हा आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विचार करून पंढरपूरला यावे, असाही इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.
आमदार रोहित पवार यांच्या पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनात गिरीश महाजन यांनी अधिवेशनापूर्वी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे बैठकीचे आश्वासन पूर्ण न झाल्याने आमदार रोहित पवार यांनी बुधवारी (दि.२४) पंढरपुरात विठ्ठल दर्शन घेऊन मराठवाडा दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा देत मंत्री महाजन यांच्यावर घणाघाती टीका केली. याप्रसंगी राष्ट्रवादी (श.प.गट) काँग्रेसचे नेते वसंतराव देशमुख, डॉ. योगेश रणदिवे उपस्थित होते.
सरकारला जनाची नाही तरी मनाची लाज वाटली पाहिजे. अधिवेशनापूर्वी होणाऱ्या बैठकीच्या आश्वासनाची पूर्तता होत नसेल तर अधिवेशनात बसून काय उपयोग. त्यामुळेच आपण आता रस्त्यावर उतरून लढाई लढत आहोत असेही त्यांनी सांगितले.
———————–
चौकट : ( मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरात विचार करुन यावे )
पुढील महिन्यात २५ जुलैला मुख्यमंत्री पंढरपुरात आषाढी एकादशीला येणार आहेत. तेव्हा आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विचार करून पंढरपूरला यावे, असाही इशारा यावेळी आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.
Post Views: 182