Saturday, September 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदभरतीसाठी  आझाद मैदान, मुंबई येथेआंदोलन ! !

तरुण भारतbyतरुण भारत
June 11, 2026
in solapur
0
शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदभरतीसाठी  आझाद मैदान, मुंबई येथेआंदोलन ! !
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मुंबई : महाराष्ट्र राज्य वरीष्ठ महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण संचालक महासंघाच्या वतीने शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदभरतीच्या प्रलंबित प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, दि. ८ जून २०२६ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत  धरणे आंदोलन  करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, शासनाने सन २०१७ पासून आजतागायत  शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदांची भरती केलेली नाही. त्यामुळे राज्यातील अनेक अनुदानित व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये ही महत्त्वाची पदे रिक्त असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व क्रीडा विकासावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.
शासनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदके मिळवायची आहेत, “खेलो इंडिया” सारख्या योजनांद्वारे क्रीडा संस्कृती रुजवायची आहे, मात्र खेळाडू घडविणाऱ्या शारीरिक शिक्षण संचालकांचीच भरती करण्यास शासन उदासीन असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. “सरकारला मेडल हवे आहेत, पण ते घडवणारे प्रशिक्षित क्रीडा शिक्षक व शारीरिक शिक्षण संचालक नको आहेत,” अशी तीव्र भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
महाविद्यालयांना शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल ही पदे बंधनकारक असताना आणि या पदांशिवाय मान्यता मिळत नसताना, शासनाने इतर सर्व विषयांच्या एकूण ५०१२ पदांना मान्यता दिली; मात्र शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदांना या भरती प्रक्रियेतून वगळण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरातील पीडित उमेदवार आणि कार्यरत शिक्षक विविध मार्गांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. मोर्चे, धरणे आंदोलने, निवेदने आणि उपोषणाच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवूनही शासनाकडून कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने आंदोलन नजीकच्या काळात अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.पदभरतीच्या प्रश्नाबाबत आवश्यक निर्णय घेणे व शासनापर्यंत वस्तुस्थिती पोहोचविण्यात दिरंगाई होत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
राज्यातील युवकांचे भविष्य, महाविद्यालयीन क्रीडा विकास आणि राष्ट्रीय स्तरावर सक्षम खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदांची भरती तातडीने करण्यात यावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही महासंघाने दिला आहे.
“क्रीडा क्षेत्र वाचवा – शारीरिक शिक्षण संचालक भरती करा!”
“रिक्त पदे तात्काळ भरा – विद्यार्थ्यांना न्याय द्या!”
डाॅ.गणेश सिंहासने, अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महाविद्यालय शारीरिक शिक्षण संचालक महासंघ.
“शासनाला पदके जिंकणारे खेळाडू हवे आहेत, पण ते घडवणारे शारीरिक शिक्षण संचालक नकोत, ही दुर्दैवी बाब आहे. २०१७ पासून प्रलंबित असलेली शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदभरती तात्काळ सुरू करून राज्यातील हजारो पात्र उमेदवारांना न्याय द्यावा, ही आमची शासनाकडे मागणी आहे.”
“मी पीएसआय पदाची नोकरी सोडून क्रीडा क्षेत्रावरील प्रेम आणि विद्यार्थ्यांसाठी काम करण्याच्या उद्देशाने शारीरिक शिक्षण संचालक हे क्षेत्र निवडले. मात्र, शासनाने या पदभरतीबाबत घेतलेल्या नकारात्मक भूमिकेमुळे आमच्यासारख्या अनेक पात्र उमेदवारांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. खेळाडू घडविणाऱ्या पदांनाच न्याय मिळत नसेल, तर राज्याच्या क्रीडा विकासाला मोठा फटका बसणार आहे.”
– शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सायकलपटू,
‘घाटांचा राजा’ सन्मानित खेळाडू
शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय सायकलपटू यांची प्रतिक्रिया डाॅ.  संघर्ष शृंगारे यांनी दिली. राज्यातील पात्रता धारक शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल शासन निर्णयाच्या प्रक्रियेसाठी सतत पाठपुरावा करत आहेत. सदर संघर्षामध्ये राज्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 339
Previous Post

सोलापूर विद्यापीठाच्या रमेश धोडमणीला राष्ट्रीय गतका स्पर्धेत कांस्य

Next Post

उजनीच्या पाण्याबाबत अधिकारी म्हणतात #marathinews #solapurnews

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

उजनीच्या पाण्याबाबत अधिकारी म्हणतात #marathinews #solapurnews

ताज्या बातम्या

श्री शंभोमारुती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न

श्री शंभोमारुती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न

September 11, 2026
कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

September 11, 2026
दुष्काळाच्या सावटाखाली बार्शीत बैलपोळा; गोरक्षण मंडळाच्या जनावरांची सवाद्य मिरवणूक

दुष्काळाच्या सावटाखाली बार्शीत बैलपोळा; गोरक्षण मंडळाच्या जनावरांची सवाद्य मिरवणूक

September 11, 2026

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

September 11, 2026

विद्यार्थ्यांच्या हातून घडणार पर्यावरणपूरक गणराय

September 11, 2026
सोलापूर एमआयडीसीत आढळला दुर्मिळ प्रजातीचा ‘रुका सर्प’

सोलापूर एमआयडीसीत आढळला दुर्मिळ प्रजातीचा ‘रुका सर्प’

September 11, 2026
महाळुंग – श्रीपूर उपनगराध्यक्षपदी भाजपाचे तानाजी भगत यांची निवड

महाळुंग – श्रीपूर उपनगराध्यक्षपदी भाजपाचे तानाजी भगत यांची निवड

September 11, 2026
गाळ्यांच्या थकबाकी वसुलीला गती द्या

गाळ्यांच्या थकबाकी वसुलीला गती द्या

September 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1194051

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!