सोलापूर – अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील, वज्रेश्वर नगर येथील बिडी कामगारांच्या कुटुंबीयांची नोंदणी, अधिकाऱ्याकडून नोंद घेऊन पंचनामा न केल्याने सुमारे 20 ते 30 कामगार कुटुंबीय सहाय्यता निधीपासून वंचित राहिले आहेत., त्यामुळे त्यांची नोंद करून गरीब महिला बिडी कामगार कुटुंबांना अतिवृष्टी सहाय्यता निधी देऊन न्याय द्या., अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांना विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे.
मा. जिल्हाधिकारी यांना अतिवृष्टी सहाय्यता निधी देण्यात यावे या मागणीच्या निवेदनात सोलापूर जिल्ह्यात व शहरात वअतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शहरवासीयांचे सामाजिक, आर्थिक, संसाराचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून, नुकसान झालेल्यांना शासनाकडून आर्थिक सहाय्य देण्यात आले. त्यापैकी अक्कलकोट रोडवरील, वज्रेश्वर नगर या परिसरात शेकडो घरामध्ये पाणी शिरून, गरीब कामगार कुटुंबीयांचे आर्थिक नुकसान झाले., त्या भागात आपल्या शासनाच्या वतीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांची नावे नोंदवून आवश्यक कागदपत्रे घेऊन नुकसान भरपाई देण्यात आली., परंतु काही नुकसानग्रस्तांची नावे नोंदवली गेली नाही., नोंदविण्याचा प्रयत्न केला असता नोंदवून घेतले नाही., ते सर्व बीडी कामगार महिला कुटुंबे असून, त्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. तरी माननीयांनी निवेदनात खाली नमूद केलेल्या गरीब बीडी कामगार कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून न्याय करावे., असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वंचित राहिलेल्या कुटुंबीयांची नावे रेखा संजू खुणे जयश्री किसनसा हबीब, विजया नरेश खुणे, शिलावती अशोक धुळम, अश्विनी गणेश सूर्यवंशी, शोभा वसंत निरंजन, सुरेखा जेकब दास, रेखा श्रीधर आडकी, सुजाता विनायक कामूर्ती, सुजाता नरसिंग मडुर, सुजाता अनिल दासरी, बेबी बाबुराव उप्पीन, सुवर्णा आप्पासाहेब उप्पीन.
सदर निवेदनाची प्रत मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.उपमुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. उपमुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.पालकमंत्री साहेब सोलापूर जिल्हा व महानगरपालिका आयुक्त सोलापूर यांना देण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे सहाय्यता निधीपासून वंचित राहिलेल्या कुटुंबियांना सहाय्यता निधी द्या, अशा मागणीचे निवेदन मा. उपजिल्हाधिकारी अमित भोसले साहेब यांना देताना, विष्णू कारमपुरी (महाराज) रेखा आडकी, रेखा खुणे, अश्विनी सूर्यवंशी, सुरेखा दास, जयश्री हबीब, यांच्यासह सहाय्यता निधीपासून वंचित राहिलेल्या कुटुंबातील प्रतिनिधी उपस्थित होते.


















