Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

प्रक्षोभक भाषण : मुस्लीम धर्मगुरू मुफ्ती सलमान अजहरीला घाटकोपरमधून अटक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 5, 2024
in india
0
प्रक्षोभक भाषण : मुस्लीम धर्मगुरू मुफ्ती सलमान अजहरीला घाटकोपरमधून अटक
0
SHARES
102
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गुजरातच्या जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मुस्लीम धर्मगुरू मुफ्ती सलमान अजहरीला रविवारी गुजरात पोलिसांनी घाटकोपरमधून अटक केली. अटकेनंतर घाटकोपरमध्ये काही काळ तणाव वाढल्याचे पहायला मिळाले. दरम्यान परिसरात पोलिसांची कुमक वाढवण्यात आली.

गुजरातमधील जुनागडमध्ये ३१ जानेवारी रोजी कथित द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी मुफ्ती सलमान अझहरी पोलिसांच्या रडारवर होता. गुजरात पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असताना घाटकोपरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुजरात पोलिसांनी मुफ्ती सलमान अजहरीला ताब्यात घेत रविवारी रात्री उशिरा जुनागडला नेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जुनागडला नेण्यापूर्वी मुफ्ती सलमान अझहरीला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. तेव्हा अजहरीला दोन दिवसाची ट्रांझिट रिमांड देण्यात आली असल्याची माहिती वकील आरिफ सिद्धिकी यांनी दिली आहे, तसेच मुंबई पोलीस अजहरींना गुजरात सीमेपर्यंत सोडल्याची माहिती मिळत आहे.

जुनागडमध्ये मुफ्ती सलमान अजहरी यांनी भाषण देताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गुजरात एटीएसने त्यांच्यावर भडकाऊ भाषण सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अजहरी आणि स्थानिक आयोजकांविरोधात आयपीसी कलम 153 बी आणि 505 (2) अंतर्गत प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी मलिक आणि हबीब या आयोजकांना अटक केली आहे.

दरम्यान मुफ्ती सलमान अजहरीला अटक केल्यानंतर रविवारी रात्री घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर अजहरीच्या समर्थकांचा मोठा जमाव जमा झाला होता. जमावाकडून पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी सुरू होती. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची स्थिती निर्माण झाल्यानंतर अजहरीने पोलीस ठाण्याच्या खिडकीतून सगळ्यांना शांत राहण्याचे आणि रस्ता मोकळा करण्याचं आवाहन केले. मात्र तरीही त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आणि घोषणाबाजी सुरूच ठेवली. घाटकोपरचा एलबीएस मार्ग हा अत्यंत महत्त्वाचा असून तो समर्थकांनी रोखून धरला होता. समर्थकांच्या मोठ्या जमावाने बराच वेळ रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सौम्य लाठीचार्ज केला. मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वातावरण शांत करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. घाटकोपरमध्ये आता शांततापूर्ण वातावरण आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर पोलीस तैनात आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कोण आहे मुफ्ती सलमान अजहरी?

मुफ्ती सलमान अजहरी हा मौलाना स्वत:ला इस्लामी रिसर्च स्कॉलर म्हणवतो. तो जामिया रियाजुल जन्नाह, अल-अमान एज्युकेशन ॲण्ड वेलफेयर ट्रस्ट आणि दारुल अमानचा संस्थापक आहे. त्याने काहिराच्या अल अजहर विद्यापीठातून शिक्षण घेतल्याची माहिती अन्य एका रिपोर्टमध्ये आहे. तो सामाजिक-धार्मिक प्रकरणांमध्ये सक्रिय असतो. त्याचा मुस्लिम चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्याने अनेक तरुणांना उपदेश केले असून तर कित्येकदा भडकाऊ भाषणदेखील दिले आहे.

Post Views: 89
Previous Post

आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Next Post

पूर्वा कौशिक आणि ‘शिवा’ची अशी झाली भेट !

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पूर्वा कौशिक आणि ‘शिवा’ची अशी झाली भेट !

पूर्वा कौशिक आणि 'शिवा'ची अशी झाली भेट !

ताज्या बातम्या

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

June 17, 2026

साखर पेठ हुमा किलिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

June 17, 2026
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

June 17, 2026
ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

June 17, 2026
अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

June 17, 2026
वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

June 17, 2026
अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

June 17, 2026
जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0914389

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697