सोलापूर : आपली तक्रार पोर्टल / माय सोलापूर नागरीकांच्या तक्रारीच्या ॲपवरील तसेच लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत नागरिकांच्या अर्जाचे निराकरण मुदतीत न करणे , केलेल्या कार्यवाहीची माहिती अद्ययावत न करणे या कामकाजातील निष्काळजीपणाच्या गैरवर्तनासाठी महापालिकेच्या एकूण ५७ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर एकूण ४५ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी कारवाईचे आदेश काढले आहेत.
नागरिकांनी नोंदवलेल्या अधिसूचित सेवा वेळेत न निकाली काढणाऱ्या आणि तक्रारी प्रलंबित ठेवणाऱ्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आपली तक्रार पोर्टल / माय सोलापूर नागरीकांच्या ॲपवरील प्रलंबित तक्रारी प्रकरणी २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना ९ हजार ५०० रुपये दंड आकारला आहे. लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अर्ज प्रकरणी ३१ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ३५ हजार ५०० रुपये दंडात्मक कारवाई केली आहे. सोलापूर महानगरपालिकेने एकूण ५७ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आर्थिक दंड आकारण्यात आला असून एकूण ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश आशिष लोकरे यांनी दिले आहेत. हा दंड त्यांच्या जून २०२६ पेड इन जुलैच्या वेतनातून वसूल केला जाणार आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून कामकाजातील निष्काळजीपणामुळे लोकसेवेवर परिणाम होत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Post Views: 15