सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयातील मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या समाजकल्याणकारी कार्याचा, न्यायप्रिय प्रशासनाचा आणि स्त्री सक्षमीकरणासाठी दिलेल्या योगदानाचा यावेळी गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला.
कार्यक्रमास जी.एस.ई. विभागप्रमुख डॉ. के. एस. पाटील, प्रा. एस. बी. नवले, प्रा. वाय. एन. बनसोडे, अझहर पाटील, ग्रंथपाल जी. एच. घोगले, ग्रंथपाल विद्यानंद बाबर, पी. एस. शिंदे, जी. डी. अतनुरे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवा, सुशासन आणि मानवतावादी मूल्ये जोपासण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले.
Post Views: 4