
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शेलगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबा गायकवाड उपस्थित होते. तसेच द लिटल स्कॉलर इंग्लिश मिडियम स्कूल, बार्शीच्या संस्थापक व प्राचार्या सौ. प्रमिला मठपती आणि भारतीय सैन्य दल, दिल्ली मुख्यालय येथील सुभेदार (जे.ई.&एम.) श्री. किशोर जाधव हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीबरोबरच शिस्त, मेहनत, चिकाटी आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यांची पूर्तता करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असा संदेश मान्यवरांनी दिला.
प्रमुख पाहुणे बाबा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना शिक्षण हेच उज्ज्वल भविष्याचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. सौ. प्रमिला मठपती यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन केले. तर भारतीय सैन्य दलातील अधिकारी श्री. किशोर जाधव यांनी विद्यार्थ्यांना देशसेवा, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेम यांचे महत्त्व विशद केले.
प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करुन महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून भविष्यात अधिकाधिक विद्यार्थी शैक्षणिक उत्कृष्टतेकडे वाटचाल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया जोशी यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करुन देत कार्यक्रमाची सुरेख मांडणी केली. प्रा. व्यंकटेश मुंढे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अभिजीत पवार, प्रा. अमित शिंदे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















