जालना – जालना येथील मंजुर छाप बिडी कारखानदारांने
बिडी कामगार महिलांकडून कामे करुन घेतली आणि त्यांची ७ महिन्यांची मजुरी
रोखून धरली. पुन्हा चालू असलेले काम बंद करुन त्यांची पिळवणुक सुरु करुन
उपासमारीला भाग पाडत असल्याने इंटक कामगार संघटनेसह कामगारांनी
जिल्हाधिकारी असिमा मित्तल यांची भेट घेवून कामगार विरोधी अधिकार्यांची
हकालपट्टी करण्यात येवून कामगारांना देण्यात यावा, अशी मागणी
निवेदनाव्दारे केली.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या पंधरा
दिवसांपासून कारखाना बंद आहे त्यामुळे कामगारांच्या हाताला काम नाही तसेच
हक्काची मजुरी रोखून धरल्याने सदरील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
यावेळी इंटक संघटनेचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम जायस्वाल, साईआन्ना चिलवर,
पुष्पाबाई गरदास, सुनिता हट्टेकर, लक्ष्मीबाई बल्लेवार, मनिषा शेरला,
तुळशाबाई चिप्पा, रत्नमाला गुरला, अनिता श्रीपत, संगीता गुल्लापेल्ली,
राधाबाई टिपरास, उमाबाई श्रीपत, विजया टिपरास, पुजा श्रीपतसह अनेक बिडी
कामगार महिला यावेळी उपस्थित होत्या.





















