सोलापूर – स्वयंपाक घरात गॅस सिलेंडर चा स्फोट होऊन लागलेल्या आगीत वडील व मुलगी भाजून जखमी झाल्याची घटना टेंभुर्णी येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजता घडली.
दयानंद मोहन कावरे (वय 35 वर्ष ) आणि गौतमी दयानंद कावरे ( वय 13 वर्षे ,दोघे राहणार टेंभुर्णी ) असे त्या भाजून जखमी झालेल्यांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी सहा वाजता ते दोघे घरामध्ये असताना अचानक गॅस सिलेंडर टाकीचा स्फोट झाला . यात लागलेल्या आहेत दोघे सर्वांग भाजून जखमी झाले . त्यांना एका खाजगी दवाखान्यात प्रथम उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात रात्री अकरा वाजता मेव्हणा विशाल थोरात यांनी दाखल केले.
Post Views: 5