Wednesday, July 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

देशात ६३वा क्रमांक; महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद शाळेचा राष्ट्रीय झेंडा उंचावला

तरुण भारतbyतरुण भारत
July 15, 2026
in solapur
0
देशात ६३वा क्रमांक; महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद शाळेचा राष्ट्रीय झेंडा उंचावला
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरणारी कामगिरी सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी (शिवणे) हिने केली आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या ‘स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकन ‘ स्पर्धेत शाळेने ९०.८० गुणांसह फाईव्ह स्टार रेटिंग मिळवत देशातील १९१ उत्कृष्ट शाळांमध्ये ६३वा क्रमांक पटकावला आहे.
                 विशेष म्हणजे, राष्ट्रीय स्तरावर गौरवासाठी निवड झालेली महाराष्ट्रातील ही एकमेव जिल्हा परिषद शाळा ठरली असून, या यशामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण व्यवस्थेचा लौकिक देशभर पोहोचला आहे.
या मूल्यांकनात स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, हात धुण्याच्या सुविधा, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा व जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, हरित परिसर, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शाश्वत विकास अशा विविध निकषांवर देशभरातील हजारो शाळांची बहुपदरी छाननी करण्यात आली. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कठोर प्रक्रियेनंतर केवळ १९१ शाळांची राष्ट्रीय गौरवासाठी निवड झाली. त्यामध्ये शेळकेवाडी शाळेने देशात ६३वे
 स्थान मिळवत ग्रामीण शिक्षणाची ताकद अधोरेखित केली.
          या यशाची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, महाराष्ट्रातून राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवणारी शेळकेवाडी ही एकमेव जिल्हा परिषद शाळा ठरली आहे. ग्रामीण भागातील शाळाही गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रमांच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, याचा आदर्श या शाळेने निर्माण केला आहे.
        या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी शाळेचे अभिनंदन करत, हा सन्मान ग्रामीण शिक्षणातील गुणवत्ता आणि स्वच्छतेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा गौरव असल्याचे सांगितले.जिल्ह्यातील इतर शाळांनीही शेळकेवाडीचा आदर्श घेऊन अशा उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कोट
प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, मुख्याध्यापक भागवत भाटेकर, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचे अभिनंदन करत, हे यश सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे नमूद केले. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता राष्ट्रीय स्तरावर सिद्ध करणारी ही कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले.
कोट
जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार यांनीही शाळेचे अभिनंदन करत, सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे गौरवोद्गार काढले.
चौकट
केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था यांनी अधिकृत पत्राद्वारे शाळेची राष्ट्रीय गौरवासाठी निवड झाल्याची माहिती दिली असून, लवकरच होणाऱ्या राष्ट्रीय गौरव समारंभात शाळेचा सन्मान केला जाणार आहे.
चौकट
या यशामागील ठळक वैशिष्ट्ये
देशात ६३वा क्रमांक
९०.८० गुणांसह फाईव्ह स्टार रेटिंग
राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद शाळा
देशातील १९१ उत्कृष्ट शाळांमध्ये स्थान
स्वच्छता, हरित परिसर आणि शाश्वत विकास उपक्रमांची राष्ट्रीय पातळीवर दखल
ग्रामीण शाळांसाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय कामगिरी
Post Views: 7
Previous Post

आंबेगाव येथील शेतकऱ्याचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू; मोटारीच्या फुटबॉलचा गाळ काढताना घडली घटना

Next Post

लाडकी बहीण ई केवायसी, बंद असलेल्या पेन्शन योजनेसाठी भिक मांगो आंदोलन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
लाडकी बहीण ई केवायसी, बंद असलेल्या पेन्शन योजनेसाठी भिक मांगो आंदोलन

लाडकी बहीण ई केवायसी, बंद असलेल्या पेन्शन योजनेसाठी भिक मांगो आंदोलन

ताज्या बातम्या

जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनाच्या ९ खेळाडूंची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड; जिल्ह्यासाठी अभिमानाची कामगिरी

जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनाच्या ९ खेळाडूंची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड; जिल्ह्यासाठी अभिमानाची कामगिरी

July 15, 2026

दीर्घकाळ विनापरवानगी गैरहजर सहा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती 

July 15, 2026
राज्यातील ३ जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना उपसंचालकपदी  पदोन्नती

राज्यातील ३ जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना उपसंचालकपदी  पदोन्नती

July 15, 2026
आदर्श पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा! गुणवंतांचा जंगी सत्कार; सुमेध हिवराळे ठरला संस्थेचा पहिला ‘आयआयटीयन’

आदर्श पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा! गुणवंतांचा जंगी सत्कार; सुमेध हिवराळे ठरला संस्थेचा पहिला ‘आयआयटीयन’

July 15, 2026
अकलूजच्या  विकासासाठी तब्बल ५३९ कोटींचा ऐतिहासिक निधी मंजूर!

अकलूजच्या  विकासासाठी तब्बल ५३९ कोटींचा ऐतिहासिक निधी मंजूर!

July 15, 2026
गोवा विद्यापीठातून डॉ. आर्या शेटे यांना   बीएएमएसची पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त

गोवा विद्यापीठातून डॉ. आर्या शेटे यांना   बीएएमएसची पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त

July 15, 2026
करकंब येथे श्री.चौंडेश्वरी भावई मिरवणूक उत्साहात साजरी

करकंब येथे श्री.चौंडेश्वरी भावई मिरवणूक उत्साहात साजरी

July 15, 2026
राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत ज.रा. चंडक प्रशालेच्या संकेत लिगाडेला कांस्य पदक

राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत ज.रा. चंडक प्रशालेच्या संकेत लिगाडेला कांस्य पदक

July 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0977658

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!