नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये सायंटिस्ट ‘बी’ पदाच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवार एनटीआरओच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. पदभरतीचा सविस्तर तपशील जाणून घेऊया.
एनटीआरओ म्हणजेच, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनने वैज्ञानिक ‘बी’ (Scientist B) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. NTRO ने जाहीर केल्याप्रमाणे पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट recruitment-ndl.nielit.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवार १९ जानेवारी २०२४ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
सायंटिस्ट ‘बी’ : ७४ जागा
पदनिहाय जागांचा तपशील :
इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन : ३५ जागा
कम्प्युटर सायन्स : ३३ जागा
जिओ-इन्फोमॅटिक्स अँड रिमोट सेन्सिंग : ०६ जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.
शिवाय, संबंधित विषयातील वैध GATE स्कोअर कार्ड असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा :
ऑनलाइन अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवारांचे कमाल वय ३० वर्षे असावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
मिळणार एवढा पगार:
एनटीआरओ मधील जागांवर निवड होणार्या उमेदवारांना प्रति महिना ५६,१०० ते १, ७७,५०० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.
अर्ज शुल्काविषयी :
सामान्य : २५० रुपये
SC, ST, महिला उमेदवार : कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
अशी असणार निवड प्रक्रिया :
उमेदवारांना संबंधित विषय / क्षेत्रातील वैध GATE स्कोअरच्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाईल.
त्यानंतर लेखी परीक्षा आणि मुलाखत होईल.
एनटीआरओमधील भरतीसाठी असा करा अर्ज :
- NTRO सायंटिस्ट बी भरतीच्या अर्जासाठी रिक्रूट्मेंट लिंकच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.undefinedundefined
- नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन ऑनलाइन फॉर्म लिंकवर क्लिक करा.
- सर्व तपशील भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- फी भरा.
- पुढील गरजांसाठी फॉर्मची प्रिंट आउट घ्या.
महत्त्वाच्या लिंक्स :
एनटीआरओच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
एनटीआरओ भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.