बार्शी – सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील पांगरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हामध्ये आरोपी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम 115(2), 118(1), 3(5), 351(3) व 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान कलम 118(2) बीएनएस समाविष्ट करण्यात आल्यानंतर अटकेची शक्यता निर्माण झाल्याने दोन्ही आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला.
सुनावणीदरम्यान आरोपीच्यावतीने ॲड. अनिकेत सहदेव गुंड यांनी प्रकरणातील तथ्ये, जखमांचे स्वरुप, आरोपींची भूमिका, तपासासाठी आवश्यक असलेले सहकार्य आणि प्रकरणातील कायदेशीर बाबी न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडल्या. तसेच प्रकरण हाताळण्याची योग्य रणनीती आणि कायदेशीर मुद्द्यांवरील सखोल युक्तिवादामुळे आरोपींकडून तपासात अडथळा निर्माण होणार नसल्याचा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. त्यांच्या या युक्तिवादाचा विचार करुन न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.
या आदेशामुळे कलम 118(2) समाविष्ट झाल्यानंतर निर्माण झालेला अटकेचा धोका टळला असून तपास सुरु राहणार असल्याचे समजते.
सदर प्रकरणात आरोपीच्यावतीने ॲड. अनिकेत सहदेव गुंड, ॲड. सौरभ विधाते यांनी काम पाहिले.
Views: 6