सोलापूर – दोन दिवसांपासून सुरू असलेला महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ क्रिकेट सामना चौथ्या दिवसात निर्णायक स्थितीत येऊन पोचला आहे. विजयासाठी एकूण ३८० आव्हान विदर्भ समोर असताना तिसऱ्या दिवशी खेळ थांबला तेंव्हा विदर्भाने १ बाद ३६ धावा केल्या असल्याने त्यांना अद्यापि ३४४ धावांची गरज असून महाराष्ट्राला ९ बळी मिळवायचे आहेत. तिसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या सलामीवीर एकनाथ देवडे चे दमदार अर्धशतक (६३ धावा) व ओम पाटील, कप्तान सुआशिक जगताप ची तडफदार शतके. या तिघांच्या उत्कृष्ट खेळीमुळे महाराष्ट्राने दुसऱ्या डावात ३१६ धावा करत डाव घोषित केला आणि पुन्हा विदर्भाला फलंदाजी साठी पाचारण करत १ बळी मिळवला असून कप्तान कुश शर्मा २६ वर नाबाद असून नाईट वॉचमन म्हणून आलेला मंथन काळे १० धावा करून खेळपट्टी वर आहेत.
तिसऱ्या दिवशी सकाळी नाबाद १६ वरून पुढे खेळताना एकनाथ देवडे आणि ओम पाटील यांनी चांगली खेळी करत ९१ धावांची सलामी दिली त्यात आधी एकनाथने ९० चेंडूत (८ चौकार) अर्धशतक झळकविले. ६३ धावा (१०८ चेंडू) काढून एकनाथ ओम धोत्रे चे गोलंदाजीवर त्रिफळा बाद झाला. त्यानंतर आलेला पहिल्या डावातील शतकवीर प्रज्वल मोरे पुन्हा एक मोठी खेळी करेल असे वाटत असताना ९ धावावर अक्षत खरे ने त्याला स्वतःच्या गोलंदाजीवर त्याला बाद केले. त्यावेळी दोघात २३ धावांची भागीदारी झालेली. त्यानंतर आलेल्या सुआशिक जगताप ने ओम सोबत जेवणाला खेळ थांबेपर्यंत ४५ षटकात १२५ धावा फलकावर लावल्या होत्या.
दुसऱ्या सत्रात दोन्ही खेळाडूंनी दमदार, उपयुक्त फलंदाजी करत धावफलक हलता ठेवताना ओम ने आधी ११७ चेंडू (७ चौकार) खेळताना अर्धशतक पूर्ण केले आणि पाठोपाठ सुआशिक ने देखील ९२ चेंडूत ८ खणखणीत चौकार मारत ५० धावा पूर्ण करत संघाचे द्विशतक पूर्ण केले. संघाला उपयुक्त अशी चौफेर फटकेबाजी करत आणि प्रसंगी एकेरी, दुहेरी धावा घेत आधी ओम पाटील ने १६१ चेंडू मध्ये १३ चौकार, १ षटकार मारत शतक साजरे केले. चहापानाला खेळ थांबला तेंव्हा दोघात १५९ धावांची भागीदारी झालेली.
मोठ्या धावसंख्या रचण्याच्या उद्देशाने तिसऱ्या सत्रात दोन्ही फलंदाजांनी खेळी सुरू ठेवली आणि १७ धावा काढल्या असताना ११७ धावां (१९३ चेंडू) वर यश पाटील ने ओम याला बाद करत जमलेली जोडी फोडली.
त्यानंतर आलेल्या वेदांत गोरे ने कप्तान सोबत उपयुक्त खेळी करत आधी संघाचे त्रिशतक पूर्ण केले आणि सुआशिक ने १४१ चेंडू मध्ये (१४ चौकार, १ षटकार) शतक पूर्ण केले. दोघात २६ धावांची भागीदारी झाली असताना वेदांत ला (१५ धावा, १३ चेंडू १-१ चौकार, षटकार) यश पाटील ने धोत्रे करवी झेल बाद केले आणि महाराष्ट्राने दुसरा डाव ३१६ वर घोषित केला आणि विदर्भ समोर विजयासाठी ३८० धावांचे आव्हान ठेवले. विदर्भ कडून यश पाटील २, अक्षत खरे १, ओम धोत्रे ने १ बळी मिळवले.
विदर्भ संघाची दुसऱ्या डावाची सुरवात मात्र खराब झाली, सलामीवीर आदि बजाज शून्य धावांवर दुसऱ्याच षटकात अभिनंदन अडक कडून बाद झाला आणि महाराष्ट्राने विजयाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले. दुसऱ्याच षटकात झटका बसल्याने नाईट वॉचमन म्हणून मंथन काळे फलंदाजीला आला आणि दोघांनी उर्वरित १० षटकात टिच्चून फलंदाजी करत दिवसाला खेळ थांबला तेंव्हा ३२ धावा जोडल्या तेव्हा १ बाद ३६ अशी धावसंख्या झाली असून अद्यापि ३४४ धावांची गरज असून उद्या शेवटच्या दिवशी ९० षटकात विजयाचे ध्येय गाठतात की उर्वरित ९ बळी घेऊन महाराष्ट्र संघ विजय प्राप्त करतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Views: 7