पंढरपूर – सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेता संदीप पाठक यांनी अस्सल पंढरपुरी बेत असलेल्या पेंडपाला आणि पोळीवर व मारला. येथील सिने कलाकार श्रीकांत बडवे यांच्या महाजन फूड्स येथे अभिनेते संदीप पाठक यांनी भेट देऊन अस्सल पंढरपुरी पेंडपाल्याचा मनमुराद आस्वाद घेतला. पंढरपूरच्या मातीतली अस्सल चव आणि आपुलकीचा अनुभव घेत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी महाजन फूड्सच्या वतीने श्रीकांत महाजन बडवे यांच्या हस्ते संदीप पाठक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कलाकारांची भेट, मनमोकळ्या गप्पा आणि पंढरपुरी खाद्यसंस्कृतीची अविस्मरणीय मेजवानी असा दुग्धशर्करा योग येथील कलाकारांना आला, यावेळी प्राध्यापक मंदार परिचारक तसेच शहरातील रंगभूमी कलाकार उपस्थित होते.
Post Views: 5