पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव परीसरात पावसाळा सुरु झाल्यापासून एकही दमदार पाऊस झालाच नाही .यामुळे बळीराजा अक्षरश हवालदिल झाला आहे .पावसाळा सुरु होऊन जवळपास तिसरा महीना सुरु झाला आहे .पण पिलीव परीसरात अद्यापपर्यंत ओढे, नाले वाहतील असा एकही पाऊस झालाच नाही .यामुळे सध्या पिके उभी आहेत. या भागात मका ,बाजरी ,कडवळ, ऊस, अशी पिके सध्या जळुन जाण्याच्या मार्गावर आहेत. श्रावण महीन्यात तरी पाऊस पडेल अशी अपेक्षा होती पण अद्याप तरी तसे चित्र दिसून येत नाही.पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी बाजरी, मका, कडवळ अशी पिके केली होती पण सध्या पावसाने ओढ दिल्यामुळे ही पिके सुकुन चालली आहेत.या भागात चाऱ्याची कमतरता असुन मकेचा दर 2500 रुपये टनापर्यंत पोहचला आहे .सध्या चाऱ्यासाठी या भागात ऊसाची मागणी वरचेवर वाढत आहे .त्यामुळे चाऱ्यासाठी ऊसाची मागणी वाढली असुन वरचेवर दरात वाढ होत आहे.सध्या सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी, या भागातील पिके पाण्यावाचून धोक्यात आली आहेत. किमान आता तरी पाऊस झाला तर चारा येण्यासाठी दोन _ अडीच महीने लागतील. यामुळे सध्या पावसावाचुन पिलीव परीसरात शेतीच्या तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो की काय अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे . पिलीव परीसरावर भिषण दुष्काळाचे सावट सध्या तरी आहे किमान गौरी _ गणपती सणाच्या दरम्यान तरी पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे .पुर्वीच्या जुन्या काळी दुष्काळात तेरावा महीना अशी म्हण प्रचलित होती .म्हणजे ज्या वेळी धोंडा महीना येतो त्या त्या वेळी पाऊस कमीच पडतो असा समज पुर्वी पासुन होता तो यंदा खरा ठरतो की काय अशी चर्चा सध्या खेडोपाड्यात सुरु आहे.कारण यंदा धोंडा महीना होता .यामुळे तेरावा महीना धोंडा म्हणजेच दुष्काळात तेरावा महीना ह्या म्हणीचा सध्या प्रत्यय येऊ लागला आहे.जर दहा _ पंधरा दिवसांत पाऊस न पडला तर पिलीव परीसरात भिषण दुष्काळाचेच सावट सध्या दिसत आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















