सांगोला – डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड यांनी चतुर्थ वर्ष बी.फार्मसी विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या अंतिम सत्र परीक्षेत सह्याद्री फार्मसी कॉलेज, मेथवडे (ता.सांगोला) येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये पवार रत्नप्रभा बंडोपंत प्रथम, घाडगे मयुरी शहाजी द्वितीय, बर्गे स्वाती भिवाजी हिने तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा अनिता दिलीपकुमार इंगवले, विश्वस्त विश्वजीत दिलीपकुमार इंगवले, प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन केले. संस्थेचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन, कॉलेजमधील अनुभवी व तज्ञ प्राध्यापक यांचे मार्गदर्शन, कॉलेजने आयोजित केलेले मार्गदर्शनपर व्याख्याने, सुसज्य ग्रंथालय, अत्याधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल कलासरूम यामुळेच आम्हास या परीक्षेत हे यश संपादन करण्यास मोलाची मदत झाली असे मनोगत यशस्वी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
Post Views: 3