पंढरपूर – पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धा पी.पी.सावनी विद्यापीठ, सुरत (गुजरात) येथे दि. २३ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित केलेल्या आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा क्रिकेट (मुली) संघ सहभागी होणार आहे. या संघामध्ये उमा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली साक्षी सागर हिची निवड झाली आहे दरम्यान साक्षीच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रशांत परिचारक, उपाध्यक्ष मुकुंद परिचारक, सचिव राजगोपाल भट्टड, खजिनदार रमेश लाड, संथेचे विश्वस्त अँड. प्रणव परिचारक व इतर संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, संथेचे कार्यवाह डॉ. मिलिंद परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धिरजकुमार बाड यांनी साक्षीचा सत्कार करून अभिनंदन केले व तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या साक्षीला शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद ढवण यांचे मार्गदर्शन लाभले.
Views: 24