सोलापूर : न्यू बुधवार पेठेतील सांची अजित गायकवाड हिला एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी अश्विनी रुग्णालयात प्रवेश मिळाल्याने मित्रपरिवाराच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले आणि माजी नगरसेवक अरुण भालेराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
न्यू बुधवार पेठ परिसरातील कन्या डॉक्टर होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याने हा संपूर्ण परिसरासाठी अभिमानाचा क्षण असल्याचेही सदाफुले म्हणाले.यावेळी धीरजकुमार माने, आप्पासाहेब गायकवाड, अमोल झेंडे, श्रीकांत भंडारे, सुधाकर राजगुरू, दीपक इंगळे, बाळासाहेब फाटके, विशाल गायकवाड यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता.
Post Views: 17