सोलापूर – शालेय शहर स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजच्या स्केटिंग खेळाडूंनी प्रथम व द्वितीय स्थान पटकावले. टेबल टेनिस स्पर्धेत मुला व मुलींच्या संघाने तृतीय स्थान संपादिले.
स्केटिंग खेळामध्ये आदिह नडगिरी प्रथम व सिद्धेश्वर लादे यांने द्वितीय स्थान मिळविले. तसेच टेबल टेनिस मध्ये मुलींच्या संघात नेहा रजपूत, अबोली कुमार, अल्फा शेख व उशश्री ढाळगे तर मुलांच्या संघात रुद्र खडतरे , प्रज्वल मबरुखाने, सिद्धेश्वर लादे यांनी संघास तृतीय स्थान संपादिले.
या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण, शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते, प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, सचिव ज्योती काडादी , शैक्षणिक सल्लागार प्रमोद दर्गोपाटील, प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
——
Post Views: 4