पंढरपूर – येथील तालुका पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत शेगावदुमाला येथील सराईत गुन्हेगार समाधान बंडू चव्हाण ( वय ३०वर्ष ) याला सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिली.
या संदर्भात माहिती देताना पोलिस निरीक्षर मुजावर यांनी सांगितले की, पंढरपूर तालुका पोलिसांनी शेगावदुमाला येथील सराईत गुन्हेगार समाधान याच्या विरुध्द दारू विक्रीचे, वाळूचे चोरीचे, मारहाणीचे आदी अकरा गुन्हे दाखल होते.
यापूर्वी देखील त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असताना देखील चव्हाण मध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. त्याने परत गुन्हे केल्याने त्याच्या विरुद्ध आगामी काळातील सण उत्सवच्या अनुषंगाने प्रतिबंध उपायोजना म्हणून दोन वर्षाकरिता तडीपारचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांना पोलीस अधीक्षकां मार्फत पाठवण्यात आला होता. त्या अनुषंगाने येथील उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी समाधान बंडू चव्हाण यास सोलापूर जिल्हातून दोन वर्षाकरिता तडीपार केली आहे.
दरम्यान सदरचा आदेश निर्गमित झाल्यानंतर पंढरपूर तालुका पोलिसांनी समाधान बंडू चव्हाण यास ताब्यात घेऊन सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वालचंद नगर पोलीस स्टेशन येथे दाखल करून वालचंद नगर पोलीस स्टेशनला तडीपारची कारवाई पूर्ण करून वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, विक्रम वडणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले, सहायक फौजदार आबा शेंडगे, पोलीस हवालदार सरगर, पोलिस हवालदार गावडे, पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी, पोलीस हवालदार मंगेश रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल हसन नदाफ, चालक पोलीस कॉन्स्टेबल गोडसे यांच्या पथकाने केली.























