
सांगोला – तालुक्यातील स्थानिक निवडणुकांमध्ये मिळालेल्या मतांच्या बेरजेनुसार सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे पारडे अत्यंत जड आहे. भविष्यातील राजकारणात २०२९ ला सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटीलच होतील असा विश्वास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. ते वेळापूर (ता.माळशिरस) येथे शिवसेना पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवाळे, खा.ज्योतीताई वाघमारे, माजी आ.शहाजीबापू पाटील, माढा लोकसभा संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील उपस्थित होते. यावेळी सांगोला आणि माळशिरस मतदारसंघातील सर्व बूथ रचनेचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जि.प.सदस्य दादासाहेब लवटे यांनी सर्वांचे स्वागत करून केली. यावेळी माळशिरस पं.स.सभापती दत्ता मगर, युवा सेनेचे सागर पाटील, सांगोला न.प.नगराध्यक्ष आनंदा माने, गटनेते पप्पू धनवजीर, उपसभापती अजय सरगर, पं.स.सदस्य बाळासाहेब बंडगर, उमेश पाटील, गुंडादादा खटकाळे, योगेश खटकाळे, धनंजय काळे, उदयसिंह घाडगे, अमित पाटील, चंद्रकांत चौगुले, महेंद्रकुमार बाजारे, विजय मगर, तानाजी भोसले, दीपक ऐवळे, बूथ लेव्हलवर काम करणारे सर्व बीएलए मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट-
सांगोला तालुक्यासाठी ६ हजार कोटींपेक्षा जास्त निधी आणला, स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना मंजूर करून घेतली तरीही केवळ मतदार याद्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आणि बूथ लेव्हलवर काम कमी पडल्यामुळे गेल्या वेळी पराभव स्वीकारावा लागला. आता भविष्यात एसआयआर मतदान पुनरीक्षण याद्यांमध्ये योग्य नावे टिकवणे आणि बोगस नावे वगळणे ही काळाची गरज असून, आगामी काळात गाफील न राहता काम करावे.
-माजी आ.शहाजीबापू पाटील
Post Views: 13