कुर्दुवाडी : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील ३४ हजार कर्मचाऱ्यांनी १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संप पुकारला. माढा न्यायालयातील एकूण ६५ कर्मचाऱ्यांनीही संपात सहभाग नोंदवून संपाच्या दुसऱ्या दिवशीही कामकाज ठप्प केले.
कर्मचाऱ्यांच्या वतीने माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांना निवेदन देण्यात आले आहे. या काम बंद आंदोलनाबाबत शासनाच्या वतीने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली गेली नाही. यावेळी सहायक अधीक्षक शामराव वलेकर, प्रवीण चिंचोळीकर, तालुका अध्यक्ष संजय डुरके, विनोद बन्ने, निरंजन पिंगळे, योगेंद्रसिंग पवार, अमर चिंनूरकर, माढेकर, प्रतीक्षा क्षीरसागर, सुषमा तुपदौरू यांच्यासह माढा न्यायालयातील महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ (गट-क), महाराष्ट्र स्टेट ज्युडिशियल स्टेनोग्राफर्स असोसिएशन्, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन बेलिफ कर्मचारी सहभागी झाले आहेत.