करमाळा – शिवसेना पक्षप्रमुख माननीय उपमुख्यमंत्री ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने शिवसेना ओबीसीच्या वतीने जेऊर येथे गरजू व लाडक्या बहिणींना 50% अनुदानात शिलाई मशीन वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.श्री. राजकुमार हिवरकर-पाटील (जिल्हाप्रमुख, सोलापूर ओबीसी) यांच्या विशेष सहकार्यातून या उपक्रमाचे आयोजन श्री. सुयश पुष्पा बाळासाहेब कर्चे (शिवसेना जिल्हाप्रमुख, ओबीसी, सोलापूर) यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबन आणि रोजगारनिर्मिती यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. समाजातील गरजू महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिवसेना ओबीसीच्या माध्यमातून भविष्यातही विविध लोकहिताचे उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास श्री. राजकुमार हिवरकर-पाटील (जिल्हाप्रमुख, सोलापूर ओबीसी), भीमराव भुसनर पाटील (ओबीसी प्रदेश प्रमुख, महासंघ), दादासाहेब लोखंडे (सोलापूर जिल्हा उपप्रमुख), तानाजी भोळे पाटील (शिवसेनाप्रमुख, माळशिरस), आकाश नाळे (शिवसैनिक), दिनेश खटके (संभाजी ब्रिगेड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच निलेश पोटे (करमाळा तालुका संपर्कप्रमुख, ओबीसी), रमेश लगस (करमाळा तालुका अध्यक्ष, ओबीसी), नागेश सातव (करमाळा तालुका उपाध्यक्ष, ओबीसी), ज्योतीराम काळे (युवासेना तालुका उपप्रमुख), प्रदीप मिटे (तालुका उपप्रमुख), राहुल जाधव (शिवसेना प्रवक्ते), कुमार माने (करमाळा शहर), आदिनाथ माने (जेऊर शहर प्रमुख), माधव सूर्यवंशी (युवासेना सचिव, करमाळा तालुका) यांच्यासह श्रीकृष्ण शिंदे टेलर, राहुल निमगिरे, प्रशांत गोडसे, मयूर मुटेकर, संकेत मुटेकर, अजित उपाध्य, सुहास शिंदे, नारायण कोंडलकर, संजय जगताप, दादासाहेब निमगिरे, योगेश निमगिरे, आजिनाथ निमगिरे, नितीन निमगिरे, करचे सर तसेच शिवसैनिक, पदाधिकारी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांनी या उपक्रमाबद्दल आयोजकांचे आभार मानत, अशा समाजहिताच्या योजना सातत्याने राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
2029 च्या करमाळा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचाच उमेदवार निवडून येण्यासाठी शिवसेनेकडून प्रत्येक तालुक्यातील गावांमध्ये शिलाई मशीन असेल व इतर अनेक योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार…
:::
श्री सुयश पुष्पा बाळासाहेब कर्चे
शिवसेना जिल्हाप्रमुख ओबीसी सोलापूर
Post Views: 8