वळसंग – (ता.द.सोलापूर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक (इयत्ता सातवी )शिष्यवृत्ती परीक्षेत श्री शंकरलिंग प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहेत.या शिष्यवृत्ती परीक्षेत कुमार आनंद किणगी, कुमारी देविका ढब्बे, कुमार यश पवार, कुमार सिद्धार्थ चनशेट्टी व कुमारी अनुजा अंटद असे पाच विद्यार्थी चमकले असून त्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या आहेत.सदर पाञ यशस्वी विद्यार्थ्यांना सिध्दाराम भैरामडगी, बसवराज दुधगी, मल्लिनाथ गौडगाव,गंगाधर बिराजदार, बाह्य परीक्षा विभाग प्रमुख बाळकृष्ण गुंड यांच्यासह वर्गशिक्षक निलकंठ कवटगी, वरिष्ठ लिपिका राजश्री दुधगी, कनिष्ठ लिपिक गौरीशंकर चनशैट्टी व इतर सर्व शिक्षक शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष श्रीशैल दुधगी, चेअरमन शिवशरण थळंगे, उपाध्यक्ष विश्वनाथ थळंगे , संचालक शिवशरण प्याटी,प्रकाश दुधगी, रमेश दुधगी मल्लिनाथ थळंगे, प्राचार्य वीरेश थळंगे, पर्यवेक्षक शिवानंद घोडके यांच्यासह इतर सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.ग्रामीण भागातून शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरल्याने वरील यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वञ कौतुक होत आहे.