माळशिरस : श्री हनुमान शिक्षण प्रसारक संस्था संचलित, विष्णुपंत कुलकर्णी विज्ञान, वाणिज्य व समीर गांधी कला महाविद्यालय, माळशिरस येथील विद्यार्थिनी अस्मिता महादेव वायदंडे हिने बी.ए. भाग १ ते ३ (स्पेशल हिंदी) या विषयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्तरावर ८०० पैकी ७०० गुण (८७.५० टक्के) मिळवत प्रथम क्रमांक पटकावला असून सुवर्णपदक प्राप्त करून महाविद्यालय व संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
या अभिमानास्पद यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी यांच्या शुभहस्ते अस्मिता वायदंडे हिचा सत्कार करून तिच्या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गेजगे सर तसेच इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सौ. अपर्णा इनामदार मॅडम यांनी अस्मिताच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करत तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या उल्लेखनीय यशामागे हिंदी विभाग प्रमुख डॉ. किसन वाघमोडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
फोटो..सत्कार करताना ॲड मिलिंद कुलकर्णी व इतर
Post Views: 5