सांगोला – छत्रपती परिवार, मरवडे (ता.मंगळवेढा) यांच्या वतीने जि.प.प्रा.शाळा बुंजकरवस्ती, सांगोला येथील सहशिक्षिका स्मिता अमोल गायकवाड यांना शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल कृतीनिष्ठ आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी शिक्षक आ.दत्तात्रय सावंत, धनश्री परिवाराचे प्रा.शिवाजीराव काळुंगे, नगराध्यक्ष यू.टी.जाधव, शिक्षक समितीचे विजय कोंबे, अमोघसिद्ध कोळी, छत्रपती परिवारचे सुरेश पवार हे उपस्थित होते. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
























