सोलापूर : असोसिएशन ऑफ जीत कुने डो मार्शल आर्ट स्पोर्ट्स सोलापूर यांच्या वतीने, सोलापूर जिल्हास्तरीय जीत कुने डो मार्शल आर्ट स्पर्धा २०२६ चे आयोजन रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी पोद्दार शाळेजवळील चैत्राली हॉल येथे उत्साहात करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन सम्यक क्रांती मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भाऊ गायकवाड,व ग्रँडमास्टर युवराज गायकवाड यांच्या हस्ते झाले. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण ग्राॅंडमास्टर युवराज गायकवाड सर व टेक्निकल डायरेक्टर मास्टर आनंद जाधव प्रल्हाद जाधव नितीन गवळी संतोष कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेत प्रथम पारितोषिक किशोर चंदनशिवे सर (यशोधरा प्रशाला, सोलापूर) द्वितीय पारितोषिक भास्कर देडे सर (संत तुकडोजी महाराज आश्रम प्रशाला) तृतीय पारितोषिक अभिजीत गायकवाड सर टीम जुळे सोलापूर यांनी पटकावले.
कार्यक्रमास ऑल इंडिया जीत कुने डो फाउंडेशनचे उपाध्यक्ष ग्रँडमास्टर युवराज गायकवाड, किकबाॅक्शिगं असोसिएशन महाराष्ट्र चे अध्यक्ष शिवराम भोसले सर,टेक्निकल डायरेक्टर मास्टर किशोर चंदनशिवे, भास्कर देडे, आनंद जाधव प्रल्हाद जाधव नितीन गवळी संतोष कांबळे उपस्थित होते.
यावेळी ग्राॅंडमास्टर युवराज गायकवाड यांचा वाढदिवस उपस्थित मान्यवर, प्रशिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थितांनी शुभेच्छा व्यक्त केल्या व त्यांच्या मार्शल आर्ट क्रीडा क्षेत्रातील कार्याबद्दल गौरव केला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मास्टर अजिंक्य गायकवाड मास्टर सम्राट गायकवाड सुनील बरगोदीया, संदीप गायकवाड, नागेश कांबळे, सुमित पाटील, विश्वजीत गायकवाड, देवदत्त सावंत, तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
असोसिएशनचे जिल्हाप्रमुख अभिजीत गायकवाड गायकवाड व असोसिएशन ऑफ ऑल इंडिया जीत कुने डो फाउंडेशन चे उपाध्यक्ष युवराज गायकवाड सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेस विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मार्शल आर्टप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
Post Views: 36