Sunday, September 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर जनता सहकारी बँकेकडून सात टक्के लाभांश जाहीर….

सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण...

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 15, 2024
in solapur
0
सोलापूर जनता सहकारी बँकेकडून सात टक्के लाभांश जाहीर….
0
SHARES
124
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बँकेकडून आर्थिक वर्ष २०२२ – २३ साठी ७ टक्के लाभांश जाहीर केला आहे. २५ फेब्रुवारी पर्यंत सभासदांच्या खात्यात हा लाभांश जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल पेंडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोविड आणि त्यानंतरच्या काळात बहुतांश सहकारी बँकांची आर्थिक स्थिती काही प्रमाणात नाजूक बनली होती. मात्र त्याही परिस्थितीत सोलापूर जनता सहकारी बँकेने गत आर्थिक वर्षात २६.१० कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून साहजिकच सहकारी बँकांवर आर्थिक समतोलासाठी काही निर्बंध लावण्यात आले होते. परिणामी बँकेला लाभांश वाटप करणे शक्य होत नव्हते. सोलापूर जनता सहकारी बँकेस आर्थिक वर्ष २०२२ – २३ मध्ये २६ कोटी १० लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने सभासदांना यंदा ७ टक्के प्रमाणे लाभांश देण्यासाठी रिझर्व बँकेकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावास अनुमती मिळाली असून ७ टक्के लाभांश सभासदांना वाटप करण्यात येणार आहे, असे बँकेचे अध्यक्ष सुनिल पेंडसे यांनी सांगितले.


सोलापूर जनता सहकारी बँकेकडे १८११ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने ९७४ कोटी रुपयांची कर्जे वितरित केली असून एकूण व्यवसाय २७८५ कोटी रुपयांचा झाला आहे. बँकेचे भाग भांडवल ७०.८९ कोटी रुपये आहे. तर बँकेची निव्वळ संपत्ती १३७ कोटी रुपये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) १२ टक्के असणे अपेक्षित आहे. मात्र सोलापूर जनता सहकारी बँकेने यातदेखील आघाडी घेतली असून बँकेची भांडवल पर्याप्तता १६.९७ टक्के आहे. त्यामुळे बँकेच्या भांडवलाची स्थिती उत्तम असल्याचेही अध्यक्ष पेंडसे यांनी स्पष्ट केले.

मागील आर्थिक वर्षात सोलापूर जनता सहकारी बँकेने ४३.५७ कोटी रुपयांचा ऑपरेटिंग नफा मिळवला आहे. तर बँकेच्या नेट एनपीएमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन नेट एनपीए ४.२८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. वर्ष २०२३-२४ मध्ये चांगली वसुली व एनपीए व्यवस्थापनामुळे आजअखेर नेट एनपीएचे प्रमाण २.४३ पर्यंत खाली आले आहे.
सोलापूर जनता सहकारी बँकेने दिलेले कर्जाचे व्याजदर इतर बँकांच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. नवीन वाहन खरेदी व गृह कर्जाचे व्याजदर कमी झाल्याने ग्राहकांना बँकेकडून दिलासा मिळाला आहे, असेही पेंडसे यांनी सांगितले.
आरबीआयने पतधोरणामध्ये पॉलिसी दरात बदल केल्याने त्याचा परिणाम ठेवी आणि कर्जे यांच्या व्याजदरात झाला आहे. अशा परिस्थितीतही बँकेने व्यवसाय वाढीसाठी विविध प्रकारच्या कर्ज योजना जाहीर केल्या आणि त्यातून समाजातील सर्व घटकांना फायदा व्हावा असा विचार केला. अमृत उत्सव कर्ज योजनेअंतर्गत कर्जावरील व्याजदर कमी करून खातेदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न बँकेने केला असल्याचेही अध्यक्ष पेंडसे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदस उपाध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी, संचालक प्राचार्य गजानन धरणे, मुकुंद कुलकर्णी, वरदराज बंग, विनोद कुचेरिया, चंद्रिका चौहान, रविंद्र साळे, आनंद कुलकर्णी, सी. ए. गिरीश बोरगावकर, राजेश पवार, पुरुषोत्तम उडता, दत्तात्रय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य डॉ. अजितकुमार देशपांडे, उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी, सहाय्यक सरव्यवस्थापक देवदत्त पटवर्धन, मकरंद जोशी, रामदास सिद्धूल, मुख्याधिकारी आनंद ताशी, मुख्य कार्यालयातील अधिकारी मदन मोरे, सुहास कमलापुरकर उपस्थित होते.

जनता बँकेच्या कामकाजाचे आरबीआयने केले कौतुक

सोलापूर जनता सहकारी बँकेने गेल्या दोन वर्षात कर्ज वसुली मोठ्या प्रमाणावर केली आहे. परिणामी बँकेचा एनपीए कमी झाला आहे. सोलापूर जनता सहकारी बँकेच्या या कामकाजाचे रिझर्व बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कौतुक केले आहे. ग्राहकांनी अधिकाधिक ठेवी सोलापूर जनता सहकारी बँकेत ठेवून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सुनिल पेंडसे यांनी केले आहे.

Post Views: 108
Previous Post

बबन घोलप यांचा उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’

Next Post

सोलापुरात शिवकालीन शस्त्र पाहण्याची मोठी संधी ; पोलीस आयुक्त राजकुमार म्हणाले, वेरी नाईस !

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोलापुरात शिवकालीन शस्त्र पाहण्याची मोठी संधी ; पोलीस आयुक्त राजकुमार म्हणाले, वेरी नाईस !

सोलापुरात शिवकालीन शस्त्र पाहण्याची मोठी संधी ; पोलीस आयुक्त राजकुमार म्हणाले, वेरी नाईस !

ताज्या बातम्या

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

बार्शीतील दोघांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई

September 19, 2026
श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

September 19, 2026
 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

September 19, 2026

बार्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांना तातडीची मदत व कर्जमाफी द्या, शिवसेनेची मागणी

September 19, 2026

गौरी गणपती आरासमध्ये लावले पोलीसांच्या कार्याचे संदेश देणारे फलक

September 19, 2026
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1235482

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!