सांगोला – सांगोला महाविद्यालयात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी (राष्ट्रीय संकल्प दिवस) आणि भारताचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती (राष्ट्रीय एकता दिवस) उत्साहात साजरी करण्यात आली. यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबूरावजी गायकवाड, उपाध्यक्ष प्रा.पी.सी.झपके, सचिव ऍड.उदयबापू घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे, महादेव झिरपे, सदस्य रावसाहेब ताठे, सुरेश फुले, शामराव लांडगे, सुधीर उकळे, चंद्रशेखर अंकलगी, उल्हास झपके, प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले उपस्थित होते. यावेळी इंदिरा गांधी यांची राजकीय कारकीर्द तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांचे ऐतिहासिक कार्य अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्र.कार्यालयीन अधिक्षक विलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती व पुण्यतिथी उपक्रम आयोजन समितीचे प्रमुख डॉ.जमीर तांबोळी, प्रशासकीय कर्मचारी बाबासो इंगोले, शंकर माने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 14