अकलूज – माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील आनंदनगर भागात घरगुती व कौटुंबिक वादातून एका विवाहित महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. फिर्यादी महिलेला आमच्या घरात राहायचे नाही, माहेरी जाऊन राहा असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली, तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी सुष्मा समीर माने (वय ३४, रा. आनंदनगर, काटकरवस्ती, ता. माळशिरस, जि. सोलापूर ग्रामीण)
यांनी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३:३० ते ३:४५ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरासमोर हा प्रकार घडला. या प्रकरणात आरोपी नारायण दत्तात्रय माने (वय ४८), शुभांगी नितीन शिंदे (वय ३६, रा. बागलकाटा बामदरा, ता. इंदापूर, जि. पुणे ग्रामीण), वर्षा संतोष शिंदे (वय ३५, रा. आरवली, जि. पुणे ग्रामीण), पल्लवी उदय मोरे (वय २७, रा. माळशिरस) आणि छाया नारायण माने (वय ४५,
रा. आनंदनगर, ता. माळशिरस) या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटना घडली त्या दिवशी आरोपींनी फिर्यादीकडे येऊन, तुम्ही आमच्या घरात राहायचे नाही, तुम्ही दोघेही तुझ्या माहेरी जाऊन राहा, आमची जागा सोड असे म्हणून वाद घातला. फिर्यादीने त्यांना तुम्ही मला शिव्या का देता असे विचारले असता, आरोपी नारायण माने व इतर
आरोपींनी फिर्यादीचे हात पकडून त्यांना घराबाहेर ओढले आणि केस ओढून गालात थापा मारल्या. तसेच आरोपी शुभांगी शिंदे हिने फिर्यादीच्या पाठीत धाक हाणून मारहाण केली आणि डोक्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. याशिवाय, आरोपींनी लोखंडी पाठी डोक्यात मारून जीवे मारण्याची धमकी दिली.
Post Views: 10