Monday, September 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स-निफ्टी सुसाट… पुढे काय करावे? गुंतवणूक करताना व्हा स्मार्ट

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 6, 2023
in india
0
शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स-निफ्टी सुसाट… पुढे काय करावे? गुंतवणूक करताना व्हा स्मार्ट
0
SHARES
85
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारतीय शेअर बाजाराने गेल्या तीन दिवसांत गुंतवणूकदारांना जोरदार कमाई करून दिली आहे. रविवार, ३ डिसेंबर रोजी चार राज्यांमधील निवडणुकीच्या निकालांनंतर स्टॉक मार्केटने सलग तीन दिवस नवनवीन उच्चांक नोंदवले आहेत. परंतु शेअर बाजारात पुढच्या घडीला काय होईल, हे सांगणे कठीण असते. त्यामुळे मार्केटच्या तेजीत काळजीपूर्वक गुंतवणूक केली पाहिजे जेणेकरून नंतर तुम्हाला पश्चात्ताप होणार नाही. बाजारातील तेजीचे मंदीत कधी रूपांतर होईल हे सांगता येत नाही, अशा परिस्थितीत गुंतवणूक करण्यापूर्वी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे.

 

 

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात तेजीचे वारे वाहत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी भारतीय बाजाराचे निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टीने उंच भरारी घेत विक्रमी वाटचाल सुरू ठेवली आहे. देशांतर्गत गुंतवणूकदार तसेच विदेशी गुंतवणूकदारांचा वाढत विश्वास या दोन गोष्टींच्या बळावर भारतीय शेअर बाजाराने सलग तीन दिवशी मोठी झेप घेतली. एकीकडे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा सेन्सेक्स सत्तरीच्या जवळ पोहोचला आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २१ हजार आकड्याला स्पर्श करण्याच्या अगदी जवळ आहे. परंतु, लक्षात घ्या की शेअर बाजारातील व्यवहार अनिश्चित असतो आणि बाजारातील तेजी कधी खाली येईल हे सांगता येत नाही, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी खबरदारी घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया तज्ञांनी दिलेल्या पाच महत्वाच्या गुंतवणुकीच्या टिप्स…

 

 

शेअर बाजारात सर्वत्र हिरवळ
देशांतर्गत बाजारात सध्या भरारी घेत असून यामागे अनेक कारणे आहेत. बाजारातील भावना सकारात्मक असून त्याला सर्वत्र पाठिंबा मिळत आहे. भारताचा जीडीपी जवळपास चार ट्रिलियन डॉलरच्या पातळीवर पोहोचला आहे, किंवा सोन्याच्या किमती आणि शेअर बाजारातील हिरवळ, आयपीओ बाजारातील तेजी आणि बीएसईच्या प्रमुख निर्देशांकाच्या मार्केट कॅपने उच्चांक पातळी गाठली, या सर्व अलीकडच्या घडामोडींनी बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि पुढेही तेजी कायम राहण्याची अपेक्षा आहे.

 

 

शेअर बाजाराच्या तेजीत काय करावे?
दरम्यान, बाजाराच्या तेजीतही गुंतवणूकदारांनी काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मार्केटमधील भावना सकारात्मक असूनही गुंतवणूकदारांनी सावधपणे गुंतवणूक करावी, जेणेकरुन बाजारात चालू असलेली तेजी कोणत्याही कारणाने कमी झाली किंवा पडझड सुरू झाली तर त्यांना कमीत कमी नुकसान सहन करावे लागेल किंवा तोटा होण्यापासून ते सुरक्षित राहतील.

 

 

बाजाराच्या तेजीत घ्यावयाची काळजी

– मार्केटच्या तेजीच्या काळात ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली पाहिजे. बाजार उच्चांकावर असला तरी विचारपूर्वक गुंतवणूक करा. थोडा वेळ घ्या, तपासा, चाचणी करा आणि नंतर योग्य ठिकाणी पैसे गुंतवा.

– बाजाराच्या तेजीच्या लाभ घेण्यासाठी जास्त कमाई करण्याच्या उद्देशाने पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांनी जोखीम तपासून घेणे महत्त्वाचे आहे. जितकी हवी तितकीच गुंतवणूक करा, जेणेकरून नुकसान झाल्यास तुमच्या नफ्यावर फारसा परिणाम होणार नाही. तज्ज्ञांच्या मते, मार्केटच्या तेजीमध्ये झालेल्या नफ्याचा आनंद लुटा आणि बाजारावर लक्ष ठेवून पुढील गुंतवणूक करा.

 

– शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते त्यामुळे कधी काय होईल याचा कोणीच अंदाज बंधू शकत नाही. त्यामुळे बुल मार्केटमध्ये पैसे कमावणारे किंवा नवीन गुंतवणूकदारांनी घसरणीच्या वेळी खरेदी करावी, ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो.

– मार्केट निर्देशकांनी अनेकदा जबरदस्त तेजीनंतर डुबकी घेतली आहे, परिणामी गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला आहे. आगामी काळात बाजाराला कोणताही मोठा धक्का बसण्याची शक्यता कमी असली तरी, तरीही कोणाचे तरी ऐकून किंवा सोशल मीडियावर पाहून बाजारात पैसे गुंतवणे टाळा.

– एकाच वेळी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी छोटी-छोटी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. याशिवाय तुम्ही गुंतवणुकीचा मार्ग बदलू शकता, जसे की SIP फॉर्ममध्ये गुंतवणूक करणे किंवा सोन्याची छोटी खरेदी करणे लाभदायक ठरू शकते.

Post Views: 105
Previous Post

बीडमध्ये दुष्काळाने पाणी टंचाई, इव्हेंट करताना सरकारला लाज असायला हवी, वडेट्टीवारांची टीका

Next Post

संजय राऊतांना काही बोलाल तर जशासं तसं उत्तर देऊ | शरद कोळी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
संजय राऊतांना काही बोलाल तर जशासं तसं उत्तर देऊ | शरद कोळी

संजय राऊतांना काही बोलाल तर जशासं तसं उत्तर देऊ | शरद कोळी

ताज्या बातम्या

फडणवीसांच्या लेकींचे व्हिडिओ झाले व्हायरल….एकदा पहाच…. #viral

September 7, 2026

खासदार प्रणिती शिंदेंनी महावितरणच्या कार्यालयातच मांडले ठाण

September 7, 2026

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात #viral #solapurnews #news #latestnews

September 7, 2026

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात #viral #solapurnews #news #latestnews

September 7, 2026

आरक्षण मुद्द्यावर पाटलांना हे म्हणाले भुजबळ #viral #marathinews #news #latestnews

September 7, 2026

अधिकाऱ्यांवर अशा भडकल्या खासदार राणावत #viral #news #marathinews

September 7, 2026

उत्तर सोलापूर तालुक्यात ऑर्केस्ट्रा बारवर छापा; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त #viral #solapurnews #news

September 7, 2026
सांगोला महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

सांगोला महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1173746

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!