पंढरपूर – आजच्या काळात मुलांची काळजी व संरक्षण, त्यांची सुरक्षितता आणि त्यांच्यामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माणकरणे ही समाजाची महत्त्वाची गरज आहे. मुलांना पोलीस यंत्रणेशी जवळीक, सुरक्षिततेची भावना आणि अडचणीच्या प्रसंगी मदत मिळण्याचा विश्वास पथनाट्याच्या माध्यमातून निर्माण होईल असे निर्भया पथकप्रमुख पोलीस उपनिरिक्षक सुप्रिया यादव यांनी सांगितले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सहा.पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक व स्वेरी कॅालेजचे विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने पथनाटयाचे सादरीकरण करण्यात आले.
समाजातीलप्रत्येक जन सुरक्षित, आत्मविश्वासपूर्ण आणि आनंदी राहावे, यासाठी हे पथनाट्य निश्चितच प्रेरणादायी ठरेल.”केवळ जबाबदारी नसून एक सामाजिक बांधिलकी आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Post Views: 6