सोलापूर – येथील पद्मशाली शिक्षण संस्था संचलित मातोश्री जनाबाई जनार्दन बिटला प्रशालेमध्ये एक ते सात ऑक्टोबर वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने पर्यावरण मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांबद्दल प्रेम व आस्था निर्माण व्हावी, त्यांचे महत्त्व कळावे यासाठी विविध प्राण्यांचे, पक्ष्यांचे, फुलांचे व झाडांचे कट आउट व मुखवटे विद्यार्थ्यांनी तयार केले.
हा उपक्रम करत असताना विद्यार्थ्यांमध्ये वन्य जीवांचे महत्त्व किती आहे हे समजते, परिसंस्थेत त्यांची भूमिका काय आहे हे समजते म्हणून अशा उपक्रमांची गरज आहे असे प्रतिपादन प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शारदा गोरटयाल यांनी केले.
विज्ञान या विषयांमध्ये असणाऱ्या परिसंस्थेचा अभ्यास यामुळे होतो तसेच त्यांचे महत्त्व कळते. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील विज्ञान व पर्यावरण शिक्षक अभिज भानप यांनी मार्गदर्शन केले.
या पर्यावरणीय शैक्षणिक उपक्रमाबद्दल पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड .श्रीनिवास क्यातम, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम विश्वस्त सुरेश बिटला, श्रीधर चिटटयाल, शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली आदींनी अभिनंदन केले.





















