सांगोला – सांगोला महाविद्यालयाच्या सन १९८० ते ८५ बॅचचे मित्र ४५ वर्षानंतर मित्र संमेलनानिमित्त श्रीराम हॉटेल, सांगोला येथे एकत्र आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैल चित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी प्राचार्य डॉ.कृष्णा इंगोले, प्रा.विजयकुमार शेटे, प्रा.रावसाहेब रेड्डी, प्रा.विजयकुमार जाधव, प्रा.भारत लोंढे, प्रा.शंकर पाटील, प्रा.भीमराव फुले, माजी प्रशासकीय अधिकारी नामदेव सुरवसे, दिलीप नष्टे, नानासो लिगाडे, मधुकर कसबे, शिवप्रभा पाटील यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. स्वागत गीत स्नेहलता खारवे, विजया खडतरे यांनी म्हटले. यावेळी डॉ.इंगोले, प्रा.रेड्डी, प्रा.जाधव, प्रा.शेटे, प्रा.पाटील यांनी आमचे विद्यार्थी वेल सेटल झाले त्यामुळे आम्ही भाग्यवान आहेत असे मनोगतात सांगितले. यावेळी स्वराद गेजगे, साधना गुळमिरे, श्रीकांत घोंगडे, रवींद्र बोत्रे, सुभाष गेजगे, प्रा.शैलजा कुलकर्णी, जमीला इनामदार, सुशीला नांगरे, प्रा.देविदास कसबे, शहाजी चंदनशिवे, सुभाष गेजगे, कल्पना नष्टे, शहाजी गेजगे, केशव सुर्वे, श्रीपाद भोसेकर, अभय कदम यांनी विविध कला दर्शनाने स्नेहसंमेलनात शोभा आणली. याप्रसंगी मुसा इनामदार, रविराज शेटे, संजय खडतरे, विनायक कुलकर्णी, हमीद इनामदार, रमेश गोडसे, रामचंद्र भजनावळे, बाळकृष्ण घाडगे, बबनराव जानकर, अनिल शेंडे, अमर गुळमिरे, तानाजी सुरवसे, धनंजय पलसे, गजानन खडतरे, हसीना खतीब, संजय पाटील, अशोक दौंडे, रावसाहेब काटे, विलास घुले, लियाकत इनामदार, नारायण जानकर, बाळकृष्ण कवडे, बाबासाहेब पाटोळे, सुहास घाटे, दीपक कांबळे, शिवाजी पाटील, किशोर शिंदे, धर्मराज बोराडे, अरुण भंडारे, मुरलीधर इमडे, श्रीकांत भंडारे, भास्कर केदार, दत्तात्रय पाटील, सूर्यकांत सावंत, नंदकुमार माने, संजय चांदणे, मधुकर नवले, कयूम मुजावर, हनुमंत भोसले, दीपक कांबळे, चंद्रकांत भंडारे, मज्जित खतीब उपस्थित होते. आभार शहाजी चंदनशिवे यांनी मानले.