बार्शी – नव महाराष्ट्र विद्या विकास मंडळ बार्शी संचलित प्राथमिक विद्या मंदिर येथे महाराष्ट्र शासनमान्य राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा एमटीएस ऑलंपियाड व मंथन परिक्षेत शाळेचे विद्यार्थिनी इ. 3 री कु. शरण्या राकेश शाहीर ३०० पैकी २८२ गुणासह राज्यात ४ था जिल्ह्यात २ रा केंद्रात १ ला क्रमांक मिळवला आहे.
इयत्ता ३ री.रोहित दत्ता कवडे ३०० पैकी २७८ गुणासह राज्यात ७ वा जिल्ह्यात ३ रा व केंद्रात २ रा व वेदांत सचिन परदेशी इयत्ता ३ री ३०० पैकी २४२ गुणासह राज्यात २५ वा जिल्ह्यात २० वा केंद्रात ३ रा याप्रमाणे यश मिळवले आहे.
मंथन परीक्षेत रोहित दत्ता कवडे इ. ३ री याने ३०० पैकी २२८ व समृद्धी नितीन गोरे ३०० पैकी २२२ गुणासह यशस्वी झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कठोर परिश्रमाने आणि सातत्याने MTS परीक्षेत हे यश प्राप्त करुन संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. संस्थेतर्फे सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मनगिरे, सचिव महादेव बुचडे, खजिनदार मोहनभाई बुचडे व संस्थेचे संचालक रावसाहेब मनगिरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.























