बार्शी – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. यांच्यावतीने घेतली गेलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ४ थी व इ.७ वी) शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये सुलाखे इंग्लिश मिडीयम स्कूल, बार्शी मधील २६ विद्यार्थ्यांन पैकी खालील १० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलेले आहे व स्कॉलरशिप परीक्षेमध्ये हे विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत.
इयत्ता ४ थी चे विद्यार्थी- कु. उन्नती स्वप्नील सुराणा- २२६ गुण, कु चैत्राली जयसिंगराव सांगळे- गुण १८०, कु. आराध्या प्रकाश वाठोरे- गुण १७६, इंद्रवर्धन राजेंद्र इंगोले- गुण १४६, कु शनया जगदीश कुंदुर- गुण १४४, अर्णव आनंद कांबळे- गुण १४०, सुभान विशाल भोसले- गुण १३४, गौरी अमोल गावसाणे- गुण १३४, स्वराज सचिन भुसारे- गुण १३८, यश सचिन सुराणा- गुण १२८.
इयत्ता ७ वी चे विद्यार्थी- वाघमारे प्रियदर्शनी अमोल- गुण १६०, नायकोजी श्रेयस सचिन- गुण १५०.
या सर्व विद्यार्थ्यांचे बार्शी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. आनंद सुलाखे, सचिव श्री. अनंत कवठाळे, सुलाखे इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक श्री. तुषार महाजन सर, मार्गदर्शक शिक्षक सौ. होनराव, सौ. शिंदे, सौ.इतापे, सौ. गपाट/काळे इ. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.औ
Post Views: 4