Tuesday, September 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वेळेत कामे पूर्ण करा : आमदार राणाजगजितसिंह पाटील

तरुण भारतbyतरुण भारत
July 31, 2026
in marathwada
0
वेळेत कामे पूर्ण करा : आमदार राणाजगजितसिंह पाटील
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

धाराशिव : विकासकामे मोठ्या प्रमाणात मंजूर झाली आहेत, निधीही उपलब्ध झाला आहे आणि कामांना सुरुवातही झालेली आहे. आता कोणतीही कारणे सांगून ती रखडणार नाहीत याची काळजी घ्या. निर्धारित वेळेत सगळी कामे पूर्ण करा. अडचणी येत असतील तर त्यावर उपाय शोधा, कायदेशीर अडथळे असतील तर पर्यायी मार्ग काढा आणि प्रत्येक काम निश्चित वेळेत पूर्ण करा, अशा स्पष्ट आणि कडक शब्दात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना  बार्शी-बोरफळ रस्त्याच्या पाहणीदरम्यान निर्देश दिले आहेत.

बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा, प्रगती आणि येणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेतला. रस्त्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी शहरातील कामाची गती वाढविण्याचेही निर्देश दिले आहे. केवळ काम पूर्ण होण्याची अंदाजे मुदत सांगून चालणार नाही. पुढील प्रत्येक १५ दिवसांत कोणते काम पूर्ण होणार, याचा ठोस कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच केवळ कागदोपत्री प्रगतीऐवजी प्रत्यक्ष कामाच्या वेगावर आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना दिल्या आहेत.

रस्त्याच्या हद्दीतील वीजवाहिन्यांचे खांब आणि डीपी हे कामातील प्रमुख अडथळे असल्याचे निदर्शनास आले आहे. हे अडथळे तातडीने दूर करून संबंधित यंत्रणांनी खांब व डीपी स्थलांतरित करण्याची कार्यवाही त्वरीत पूर्ण करावी, असे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत. काही ठिकाणी कायदेशीर बाबींमुळे कामात अडथळे निर्माण होत असल्याचेही यावेळी समोर आले. मात्र, अशा कारणांमुळे विकासकामे थांबविणे योग्य नसल्याचे सांगत, जिथे अडचणी आहेत तेथे पर्यायी आणि व्यवहार्य उपाय शोधून कामे पुढे नेण्याचे आदेश आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले आहेत. यावेळी नगराध्यक्षा नेहाताई काकडे, सतीश दंडनाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत, मुख्याधिकारी नीता अंधारे, नगरसेवक अभिजित काकडे, अभिजित पतंगे, पृथ्वीराज दंडनाईक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

१४० कोटींच्या १४ विकासकामांकाही आढावा;

धाराशिव शहरातील सुमारे १४० कोटी रुपयांच्या १४ विकासकामांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक कामाची सद्यस्थिती, प्रगती, तांत्रिक व प्रशासकीय अडचणी तसेच काम पूर्ण होण्याचा कालावधी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून यावेळी माहिती घेण्यात आली. प्रत्येक विकासकामासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करून संभाव्य अडथळे तातडीने दूर करावेत आणि कामांना गती द्यावी, असे आदेश यावेळी देण्यात आले. नागरिकांच्या पैशातून उभारली जाणारी कोट्यवधी रुपयांची विकासकामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचनाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी दिल्या आहेत. तसेच, ज्या ठिकाणी विकासकामे सुरू आहेत, त्या कामांचा दर्जा आणि गुणवत्ता कायम राखण्यासाठी स्थानिक नागरिकांनी समिती स्थापन करून कामावर नियमित लक्ष ठेवावे आणि काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने पूर्ण होण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.

Post Views: 46
Previous Post

साई बानो कंपनीच्या औषध फवारणीने केळी पीक जळाले

Next Post

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सुलाखे इंग्लिश  मिडीयम स्कूलचे  यश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सुलाखे इंग्लिश  मिडीयम स्कूलचे  यश

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सुलाखे इंग्लिश  मिडीयम स्कूलचे  यश

ताज्या बातम्या

महापालिका कौन्सिल हॉल येथील श्री गणरायाची महापौरांच्या हस्ते विधिवत पूजा

महापालिका कौन्सिल हॉल येथील श्री गणरायाची महापौरांच्या हस्ते विधिवत पूजा

September 15, 2026

रस्तापूरमध्ये युवक व त्याच्या आईवर पाचजणांचा हल्ला, सर्व आरोपींना अटक

September 15, 2026

पिलीव येथे ढोल ताश्यांच्या गजरात गणरायांचे मोठ्या उत्साहात स्वागत

September 15, 2026

६६४ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासकराज! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी सीईओ कुशल जैन यांचे आदेश

September 15, 2026
ईच्छा भगवंताची गणेशोत्सव‎ तरुण‎ मंडळाची‎ प्रतिष्ठापना‎ मिरवणूक‎ जल्लोषात

ईच्छा भगवंताची गणेशोत्सव‎ तरुण‎ मंडळाची‎ प्रतिष्ठापना‎ मिरवणूक‎ जल्लोषात

September 15, 2026
अभियांत्रिकी दिनानिमित्त BIGCE मध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

अभियांत्रिकी दिनानिमित्त BIGCE मध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

September 15, 2026

कंदलगाव, गुंजेगावात महिनाभर पाणी, मग मंद्रूपचे शेतकरी पाण्यापासून वंचित का ?

September 14, 2026
देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

September 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1211362

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!