बार्शी – येथील ज्येष्ठ कवयित्री, लेखिका सौ. सुमन शिवानंद चंद्रशेखर यांना ‘परिमळ’ या कवितासंग्रहासाठी विश्वरत्न इंग्लिश मीडियम स्कूल काव्यगौरव पुरस्कार (राज्यस्तरीय) जाहीर झाला आहे. ऋत प्रकाशन, बार्शीने प्रकाशित केलेल्या ‘परिमळ’ या कवितासंग्रहासाठी ग्रामीण कवी चंद्रकांत मोतीराम जोगदंड, माळवाडी, हडपसर, पुणे आयोजित वैशाखी वादळवारा काव्य महोत्सवात दि. ७ जून २०२६ रोजी एस.एम. जोशी फाऊंडेशन, नवीपेठ, पुणे येथे हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बार्शीतील ज्येष्ठ साहित्यिक श्री. मुकुंदराज कुलकर्णी, दत्ता गोसावी, प्रकाश गव्हाणे, रामचंद्र इकारे, शिवानंद चंद्रशेखर, आबासाहेब घावटे- अध्यक्ष कवी कालिदास मंडळ, पां. न. निपाणीकर- अध्यक्ष मसाप. बार्शी, बब्रुवाहन देशमुख, डॉ. रविराज फुरडे, कांदे, दिलीप कल्याणी, धुमाळ, श्रीमती शारदा पानगांवकर, मंगल माळी, कालिदास मंडळ व मसापचे सर्व सदस्य, साहित्यरसिक यांनी सौ. सुमन चंद्रशेखर यांचे अभिनंदन केले आहे.