सन १९७२ मध्ये मास्टर प्लॅन नगरपालिकेने तयार केले असले तरी शासनाने सुचविलेल्या सूचनेवरून वेळोवेळी त्यात दुरुस्ती करणेत आले आहे. सुधारित प्लॅन २०१२ मध्ये जाहीर करण्यात आले आहे. स्वामी समर्थ मंदिराच्या दक्षिण महाद्वार ते मुरलीधर मंदिर, फत्तेसिह चौक, तूप चौक ,कापड बाजार मेन रोड, कारंजा चौक, मार्गे समाधी मठ ते ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर पर्यंत असे आहे. हा मार्ग १२ मीटर रुंदीचे, ८५० मीटर लांबीचे प्रस्तावित केल होत सध्या २५ ते २८ फुटाचे रस्ता अस्तित्वात असून आणखीन दोन्ही बाजूने मिळून १० फुटाचा भूसंपादन कराव लागणार आहे. यासाठी किमान २०० प्रॉपटी बाधित होणार आहेत. . प्रस्तावित आराखडा तयार करण्यावेळची स्थिती व सध्या अक्कलकोट तीर्थक्षेत्री येणारे प्रचड भाविकांची संख्या पाहता मंदिर परिसरातील रस्ते १०० फुट रुंद असणे अत्यावश्या बनले आहे . यामुळे २०१२चा सुधारीत आराखडा बदलुन २०२६ सुधारीत आराखडा बनवावा लागणार आहे . यामध्ये रस्ते रुंदीकरणात अधिक मालमत्ता बाधीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
दुसरा मार्ग:- मंदिराच्या उत्तर महाद्वार ते गुरू मंदिर, राम गल्ली, मधला मारुती, सुभाष गल्ली, दावल बँड ते कारंजा चौक मार्गे समाधी मठ असा दुसरा पालखी मार्ग असणार आहे. ९ मीटर रुंदीचा, ६०० मीटर लांबीचा असून सध्या २२ फुटाचा रस्ता अस्तित्वात आहे. दोन्ही बाजूने मिळून ८ फुटाचा भूसंपादन करावा लागणार आहे. १२५ ते १५० प्रॉपर्टी बाधित होणार आहे. हा पालखी मार्ग देखील नव्याने सर्वेक्षण करुन पुढील ५० वर्षाचे नियोजन पाहता यामध्ये बदल करावे लागणार अहेत .
आदर्श गुख्याथिकारी रमाकांत डाके
सध्याचे मुख्याथिकारी रमाकांत डाके कुठल्याही दबावाला बळी न पडणारे आदर्श मुख्याधिकारी लाभले असुन तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीची स्वामी सेवा म्हणुन विकासकामे ते मार्गी लावत आहेत .नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी आ . सचिन कल्याणशेट्टी हे शहराच्या विकास कामात गुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या पाठिशी खबीरपणे उभे आहेत यामुळे शहराच्या पुढील ५० वर्ष दृष्ठीने नियोजन करणे गरजेच आहे .