बार्शी – महान गायक स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार दि. ३१ जुलै रोजी मोहम्मद रफी फॅन्स क्लब तळेगाव दाभाडे येथे मोहम्मद रफी यांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमात मोहम्मद रफी यांची गीते सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमात जवळपास ३० सदस्यांनी गाण्यांची पेशकश केली
सदर कार्यक्रमात बार्शीचे सुनिल फल्ले यांनी ही गीत सादर केले. त्याचवेळी त्यांनी ११,००० गीते पूर्ण केल्याबद्दल स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रुप सदस्य नगराध्यक्ष संतोष दाभाडे, नगरसेविका सौ. हेमलता खळदे, लायन्स क्लब अध्यक्षा सौ. अमृता कुलकर्णी, मो. रफी फॅन्स क्लबचे पदाधिकारी सूर्यकांत काळोखे, बिजेंद्र किल्लावाला, नितीन खळदे, बाळासाहेब लोणकर, सुरेश शेंडे, सुनील महाजन, विनायक हेंद्रे, राधेश्याम भांडरी, तुषार केंद्रे, आरिफ सय्यद, सतीश देशपांडे, यश हंबीर, वैशल शहा, सुभाष वाळूंज, रशीद पठाण, अरुण कुलकर्णी, रमेश डोळे, शैलजा फुलकर उपस्थित होते. यावेळी महेश चौरे, गिरीश चौरे, दीपाली चौरे, बेबीताई फल्ले उपस्थित राहून सुनिल फल्ले यांचे अभिनंदन केले. याबद्दल वृक्ष संवर्धन समिती, ओन्ली समाजसेवा संस्था बार्शी, अकाउंटंट असोसिएशन, वीरशैव लिंगायत तेली समाज, प्रसन्नदाता मंडळ, जाणीव फाउंडेशन, फक्त हौशी कलाकार ग्रुप, बार्शी पत्रकार संघ, डिजीटल मिडिया पत्रकार संघ, श्री भगवंत आरती परिवार, हेल्थ क्लब, जय शिवराय प्रतिष्ठान या संस्थानी फल्ले यांचे अभिनंदन केले.
Post Views: 46