मोडनिंब – येथील श्री स्वामी समर्थ मंदिर व जोतिबा मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी कीर्तनकार हभप श्रीकांत महाराज आरोळे यांचे कीर्तन झाले. आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.
बुधवारी दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील, पंचायत समिती सदस्या प्राजक्ता बालाजी पाटील यांच्या हस्ते महाआरती झाली.चंद्रकांत गिड्डे व स्वामी समर्थ मंगल कार्यालय यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. चंद्रकांत गिड्डे यांच्या वतीने दरवर्षी या सोहळ्याचे आयोजन केले जाते.
यावर्षी हे २५ वे वर्ष आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रतिवर्षी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात येतो.

























