अकलूज – श्री संत शिरोमणी गोरोबाकाका कुंभार देवस्थान ट्रस्ट चाकोरे तालुका माळशिरस यांच्यावतीने वारकरी संप्रदायातील महान संत, श्री संत गोरोबा काका कुंभार यांची 709. वी आणि अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांची 148 वी पुण्यतिथी चैत्र महिन्यामध्ये कृ.१३ या तिथीला अत्यंत भक्तीभावाने व उत्साहात साजरी केली .
गोरोबाकाकांच्या आणि स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यानिमित्ताने हनुमान भजनी मंडळ, बावची तालुका मंगळवेढा यांनी वारकरी संप्रदायातील अभंग उत्तमरीत्या गायन करून भावीक भक्तांना मंत्रमुग्ध केले.
त्याचप्रमाणे श्री दत्तकृपा भजनी मंडळ चाकोरे यांनी संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या अभंगांचे गायन केले. दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी होऊन आरती व नामजप करण्यात करण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप केले. संत गोरोबाकाकांच्या ‘मातीशी नातं आणि भक्तीतून जीवन’ या संदेशाचे स्मरण केले जाते.
संत गोरोबाकाका हे साधेपणा आणि निस्सीम विठ्ठलभक्तीचे प्रतीक मानले जातात. त्यांचे जीवन आणि शिकवण भक्ती, प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठा यांचा संदेश देते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चाकोरे गावातील सर्व कुंभार बांधव आणि मित्र मंडळ यांनी मदत केली.

























