संभाजीराव शिंदे विद्यामंदिर, विडी घरकुल संकुलाच्यावतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे आधारवड *स्व.विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे, विद्येची देवता माता सरस्वती व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन* यांच्या प्रतिमापूजनाने झाली.
कार्यक्रमास संस्थासदस्या *डॉ.राधिकाताई चिलका* यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक *प्रा.नवनाथ व्हटकर* यांनी केले.
डॉ.राधिकाताई चिलका* यांच्या हस्ते *श्री.नागेश बंडे* यांना मुख्याध्यापक संघाचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार,*प्रा. प्रदिप खराडे* यांना स्व.सौ.पल्लवी प्रफुल्ल दळवी विद्या प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार, *सौ. लता बाटगिरी* यांना रोटरी क्लब सोलापूरचा आदर्श शिक्षिका पुरस्कार, *श्रीमती वैशाली गवळी* यांना श्री बसवेश्वर विचार मंचचा आदर्श शिक्षिका पुरस्कार,*सौ. गीता गोटिपामुल* यांना राष्ट्र भाषा हिंदी प्रेमी संघाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच *चि.सर्वेश स्वामी* याने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल व सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी मार्गदर्शिका *श्रीमती तनुजा मारपल्ली*, प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक *श्री.नागेश बंडे*,ज्यु.कॉलेजचे विभागप्रमुख *प्रा.नवनाथ व्हटकर*, प्राथमिकच्या प्र.मुख्याध्यापिका *सौ.शैलजा लंगोटे* यांची प्रमुख उपस्थिती होती. *डॉ.राधिकाताई चिलका* व *प्रा.शेखर कुलकर्णी* यांनी भाषणातून शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. सूत्रसंचालन *प्रा. नयना भोसले* यांनी केले तर आभार *प्रा.दिप्ती राठोड* यांनी मानले.
Post Views: 24