अक्कलकोट – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७८ वा वर्धापन दिन पंचायत समितीचे सभापती सागर कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अक्कलकोट आवारात झालेल्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आगारप्रमुख सत्यशिल खताळ होते.
प्रारंभी अनिल पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले.
वर्धापन दिनानिमित्त सागर कल्याण शेट्टी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि केक कापून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आगारप्रमुख सत्यशिल खताळ यांच्या हस्ते सभापती सागर कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला.तर एका बसचे पूजन करण्यात आले. यावेळी वर्षभर विना अपघात बस चालवणाऱ्या १०४ चालकांचा सन्मान रोख पंधराशे रुपये आणि पुष्पगुच्छ देऊन सभापती सागर कल्याण शेट्टी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी भाजपा मंडलाध्यक्ष अमोल हिप्परगे आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर यांनी समायोजित मनोगत व्यक्त केले परिवहन महामंडळामुळे महाराष्ट्रातल्या गोरगरीब आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनतेला प्रवासासाठी मोठा आधार आहे. इतर किती सुविधा झाल्या तरी देखील “लाल परीच”वरच महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास आहे.ते एकमेव प्रवासाचे साधन आहे.असे सांगत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष शिवानंद फुलारी, स्थानक प्रमुख नागेश रोडगे, वाहतूक नियंत्रक मदन घाडगे, अनिल पाटील, विशाल दिलपाक, युवराज घुगे, मलकप्पा पाटील, सिद्धाराम चौगुले यांच्यासह एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 7