Tuesday, July 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

एकाच छताखाली शिक्षण’चा प्रयोग; जि.प. शाळा आणि अंगणवाड्या येणार एकत्र 

तरुण भारतbyतरुण भारत
May 29, 2026
in solapur
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – राज्यातील पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण एकत्रित करण्याच्या दिशेने शासनाने महत्त्वाचे पाऊल टाकले असून आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्या एकाच परिसरात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
        नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार पूर्व प्राथमिक शिक्षण मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार भविष्यात अंगणवाडी आणि प्राथमिक शिक्षण यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षणाची हमी देताना आता पूर्व प्राथमिक स्तरालाही शाळेशी जोडण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू झाला आहे.
         प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या उपलब्ध आहेत, त्या वर्गखोल्या अंगणवाड्यांसाठी उपलब्ध करून द्याव्यात. या संदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करून अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत संचालनालयाकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
           दरम्यान, या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच शालेय वातावरण मिळणार असून पूर्व प्राथमिक ते प्राथमिक शिक्षणाचा संक्रमण टप्पा अधिक सुलभ होणार असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. तसेच अंगणवाडी सेविका आणि शिक्षक यांच्यातील समन्वय वाढून बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत असून येत्या काही महिन्यांत जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया वेग घेण्याची शक्यता आहे.
चौकट
वर्गखोल्यांच्या कमतरतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
राज्य शासनाच्या या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील वर्गखोल्यांच्या कमतरतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये आधीच जागेची कमतरता असून काही ठिकाणी विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवून शिक्षण दिले जाते. अशा परिस्थितीत अंगणवाड्या त्याच परिसरात स्थलांतरित करणे व्यवहार्य कसे ठरणार, असा प्रश्न शिक्षणप्रेमी उपस्थित करत आहेत. विशेषतः ज्या गावांमध्ये शिल्लक वर्गखोल्या नाहीत, तेथे शासनाने तातडीने नवीन वर्गखोल्या उभारणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. अन्यथा परिपत्रक केवळ कागदावरच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Post Views: 49
Previous Post

सोलापूर जि.प.मध्ये ३१ मे रोजी ३३७ कर्मचारी सेवानिवृत्त !

Next Post

पर्यावरण संवर्धनासह विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर भर !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पर्यावरण संवर्धनासह विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर भर !

पर्यावरण संवर्धनासह विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर भर !

ताज्या बातम्या

वारी दरम्यान खासगी दवाखाने सुरू राहणार…… #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

राम मंदिर देणगीचे राजकारण करू नका #viral#nationalnews

July 21, 2026

*सावधान ही दृशे तुम्हाला विचलित करू शकतात* समृद्धी महामार्गावर एकाच कुटुंबातील तिघांसह सहाजण ठार

July 21, 2026

केशरी कार्डधारकानो ही बातमी वाचाच….. #viral #maharashtranews #marathinews #news

July 21, 2026

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिक्षणमंत्र्यांना बैठक घेण्याचे निर्देश #viral #maharashtranews

July 20, 2026

महिलेने फेकली धार्मिक भावना दुखावणारी चिठ्ठी, महिलेवर गुन्हा दाखल #viral #marathinews #solapurnews

July 20, 2026

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी अकलूज येथे स्वागत करताना जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन

July 20, 2026

खास वारकरी वेशात जिल्हाधिकाऱ्यांनी केले भविकाना निवेदन #viral #marathinews #solapurnews

July 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0989793

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!