सोलापूर – फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर कडील गहाळ झालेले एकुण १३ विविध कंपनीचे अॅन्ड्रॉईड मोबाईल त्याची किमंती २,४५,०००/- रुपये असे मोबाईलचा तांत्रिक पध्दतीने व गुप्त बातमीदारा मार्फत शोध लावुन डी. बी. पथकांने उल्लेखनिय कामगीरी केली आहे व तक्रारदारांना परत करण्यात आले.
गहाळ मोबाईलचे कंपनी, मॉडेल, आयएमईआय नंबर याचा वापर करुन तांत्रिक पोलिसांनी तपास सुरु केला. गुप्त बातमीदार यांची शोध घेण्यासाठी मदत घेवुन सन २०२६ मधील २,४५,०००/- रुपये किमंतीचे एकुण १३ विविध कंपनीचे अॅन्ड्राईड मोबाईल हॅन्डसेट सोलापूर शहर व परजिल्हा तसेच परराज्यातुन हस्तगत केले. व सदर मोबाईल हे तक्रारदार यांना परत मिळवुन दिले.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त विभाग-१, प्रताप पोमण, वपोनि महादेव राऊत, दुपोनि तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, पोह/बसवेश्वर परीट, पोना/शिवानंद भिमदे, पोकॉ/सुधाकर माने, पंकज घाडगे, पोकों/शशिकांत दराडे, विनोद व्हटकर, अर्जुन गायकवाड, अजय चव्हाण, पोकॉ/सुरज सोनवलकर, पोकों/अतिश पाटील, कृष्णा बडुरे, पोकॉ रवि धेंडे, तोसिफ शेख, पोकों/नितीन मोरे, विनोदकुमार पुजारी, अमोल खरटमल, विनायक जाधव, ज्ञानेश्वर गायकवाड, यांनी केलेली आहे.

















