मंगळवेढा – येथील संत कान्होपात्रा महिला पतसंस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच ढगे डिजीटल सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.अध्यक्षस्थानी पतसंस्थेच्या संस्थापक चेअरमन सीमा दिगंबर भगरे होत्या.
सुरुवातीस पतसंस्थेच्या व्यवस्थापिका करिश्मा मुलाणी यांनी मागील सालाचा इतिवृत्तांत सादर करून अहवाल वाचन केले.
सदर प्रसंगी थकित कर्जवसुली,आदर्श उपविधी स्विकारणे,खातेदारांना नवनवीन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे तसेच इतर अनेक महत्वाच्या विषयावर साधक बाधक चर्चा झाली.तसेच यावर्षी ही पतसंस्था नफ्यात आल्यामुळे सर्व संचालक मंडळाचे टाळयांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले.
प्रास्तविक राजेंद्रकुमार जाधव यांनी केले. तर अकौंटंट रोहिणी माने यांनी आभार मानले.
या सभेस पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन सुवर्णा नामदेव काशिद,संचालिका सुवर्णा लक्ष्मण नागणे,महानंदा तात्यासाहेब चव्हाण,महानंदा नवनाथ सावळे,शुभांगी भारत मोरे,रसिका लक्ष्मण हेंबाडे,गितांजली राजेंद्रकुमार जाधव,गायत्री निशिकांत प्रचंडराव यांचेसह दिगंबर भगरे,लक्ष्मण नागणे,नवनाथ सावळे,नामदेव काशिद,अॅड.सुजय लवटे,तात्यासाहेब चव्हाण,दावल इनामदार,सचिन डोरले,लहू ढगे,प्रमोद बिनवडे,बबन भोसले,बबन दत्तू,अजय भगरे व सभासद उपस्थित होते.