पिलीव – विठ्ठल रुक्मिणी माता यांच्या दर्शनासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून पिलीवमधुन पंढरपूर नगरीकडे असंख्य साधुसंत, महंत व महाराज यांच्या दिंड्या व पालखी सोहळे “ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषामध्ये”आणि टाळ मृदुंगाच्या गजरात मार्गक्रमण करत असतात .

गोदावलेकर महाराज, बत्तीसशिराळ्याहून श्री. गोरक्षनाथ महाराज ,पुसेगावहून सेवागिरी महाराज तर शेकोबा दादा महाराज, दादा महाराज सातारकर ,कोटेश्वर शिरसवडी इंचगिरी, हरिहर गड सुळेवाडी (पिलीव) हरिहर बाबा महाराज, सद्गुरु रामगिरीबाबा महाराज (शिरढोण)अशा अनेक साधुसंत, महंत, व महाराजांच्या दिंडी व पालखी सोहळ्यांनी सांगली सातारा व इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करून ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या पिलीव नगरीमध्ये “राम कृष्ण हरी, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम”च्या निनादात खांद्यावरती भगवी पताका घेऊन प्रवेश करतात.यंदा 19जुलै रोजी अकरा तर 20 जुलै रोजी दहा अशया एकुण 21 पालख्या व लहान दिंड्या पिलीव येथे मुक्काम करुन पंढरपूर कडे मार्गस्थ होतात. आगमानावेळी ग्रामस्थ व भाविक भक्तांच्या भक्तीभावाने होऊन अतिशय आनंदामध्ये सर्व घटकातून फटाक्याच्या आतषबाजीत व तोंडातून हरिनामाच्या जयघोषाने जागोजागी घरोघरी अतिशय भक्तिभावाने स्वागत करण्यात येते .. दिंडी व पालखी सोहळ्यातील भाविकांच्या फुगडी नृत्याने त्याचप्रमाणे अभंगाने अंतकरणापासून आनंद व्यक्त केला जात होता व प्रत्येक नागरिक मोठ्या भक्ती भावाने दर्शनाचा लाभ घेत असल्याचे चित्र दिसून आले. व पिलीवला प्रति पंढरपूरचे स्वरूप आल्याचे दिसून आले. सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद त्याचप्रमाणे आरोग्य विषयी सुविधा, तसेच रस्तो रस्ती स्वच्छता, दिव्यांचा लखलखाट यामुळे पिलीव नगरी गजबजलेली दिसून येते. . पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, जवाहर शेतकी विद्यालय, मंदीरे, जिल्ह्य परिषद प्राथमिक शाळा व इतर ठिकाणी पालखी मुक्कामी असतात.यंदा माळशिरस पंचायत समितीच्या वतीने माळशिरस पंचायत समितीतीच्यावतीने उपसभापती मनिषा मदने _ पाटील यांच्या घराजवळ वारकऱ्यांसाठी भव्य असा सुसज्ज शमीयाना ( जर्मन टेंट) याची उभारणी करण्यात आली आहे. याठिकाणी विज ,पिणयाचे पाणी ,वापरासाठी पाणी ,शौचालयाची सोय करण्यात आली आहे. पिलीव नगरी पालखी आगमन व स्वागतासाठी सज्ज झाली आहे.प्रशासक अशवजीत सरवदे, ग्रामविकास अधिकारी सदाशिव भंडलकर, तसेच महावितरण विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगीतले. तर पिलीव परीसरातील विविध गणेश मंडळे, सामाजिक संस्था व भाविक भक्त वारकऱ्यांसाठी चहा पाणी ,नाष्टा, महाप्रसाद देण्याची अनेक वर्षांपासूनची अखंडित परंपरा पिलीव परीसरात आजही सुरु आहे.पालखी आगमनाने पिलीव नगरी भाविक भक्तांच्या आगमनाने अक्षरश भक्तिमय वातावरण पाहवयास मिळते आहे. फोटो _ माळशिरस पंचायत समितीच्या वतीने वारकरयांसाठी उभारण्यात आलेला भव्य शमीयाना (2) पालखी आगमन
Post Views: 17