मोडनिंब – (ता. माढा) येथील रोटरी क्लबच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आदर्शनगर येथे विद्यार्थ्यांना वृक्षांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप देण्यात आले.पर्यावरण संवर्धनाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, तसेच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व त्यांना समजावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या रोपांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.कार्यक्रमाच्या प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत संजय ढगे यांनी केले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल शिंदे, सचिव डॉ. प्रशांत कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अतुल गाडे व पत्रकार प्रथमेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल वरवडे, उपाध्यक्ष विशाल गुळवे, सदस्य सचिन सुर्वे, भास्कर ओहोळ, सोमनाथ शेंडगे, संतोष चव्हाण, अमोल पाटील, सागर शेलार, शोभा चव्हाण तसेच विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार उर्मिला टिळेकर यांनी मानले.
Post Views: 8